रिकी थॉमस पॉंटिंग (Ricky Ponting) हा ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटर आहे. आता तो क्रिकेट प्रशिक्षक, समालोचक म्हणूनही काम पाहतो. तो एक सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि कर्णधार म्हणून ओळखला जातो. पाँटिंग २००४ ते २०११ दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये आणि २००२ आणि २०११ दरम्यान एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मध्ये ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय संघाचा कर्णधार होता आणि तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो.
त्याने ३२४ सामन्यांपैकी २२० सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. म्हणजे त्याचा विजयाचा दर ६७.९१% असा राहिला आहे. आंतरराष्ट्रीय शतकांच्या संख्येनुसार तो क्रिकेटपटूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. पुरुष क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने २००३ आणि २००७ क्रिकेट विश्वचषक आणि २००६ आणि २००९ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. १९९९ क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचाही तो खेळाडू होता.
(हेही वाचा Terrorism : दहशतवाद्यांच्या निशाण्यावर महाराष्ट्र…?)
१९ डिसेंबर १९७४ रोजी लॉन्सेस्टन, तस्मानिया येथे रिकी पाँटिंगचा (Ricky Ponting) जन्म झाला. त्याचे काका ग्रेग कॅम्पबेल १९८९ आणि १९९० मध्ये ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेट खेळले आहेत. पाँटिंग हा कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे.
२०१७ मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सर्वेक्षणात त्याचा “क्रिकेटर ऑफ द डिकेड २०००” म्हणून गौरव करण्यात आला. जुलै २०१८ मध्ये त्याला ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले. तो ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम करतोय.
Join Our WhatsApp Community