ऋषभ पंत ठरला सर्वोत्तम कसोटीपटू! BCCI ने केले अभिनंदन

135

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ने ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह टीम इंडियाच्या या दोन खेळाडूंचे विशेष कौतुक केले आहे. BCCI ने या दोन्ही क्रिकेटपटूंनी २०२२ मध्ये केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

( हेही वाचा : मुलींनो! संरक्षण दलात सैन्य अधिकारी व्हायचंय? ‘या’ शहरात सरकार उभारणार प्रशिक्षण संस्था)

ऋषभ पंतच्या सर्वाधिक धावा 

ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांनी यावर्षी भारताकडून कसोटीत सर्वोत्तम कामगिरी केली. बुमराहच्या कामगिरीत आणखी सुधारणा होऊ शकली असती मात्र तो दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध खेळू शकला नव्हता. २०२२ मध्ये भारतीय कसोटी फलंदाजीमध्ये ऋषभ पंत हा अव्वल स्थानी आहे. या वर्षात कोणत्याही भारतीय फलंदाजाने ऋषभ पंतपेक्षा जास्त धावा केलेल्या नाहीत. पंतने २०२२ मध्ये ७ कसोटी खेळल्या यात त्याने १२ डावांमध्ये ६८० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतके आणि ४ अर्धशतके केली होती.

सर्वात यशस्वी गोलंदाज

भारतीय कसोटी क्रिकेट २०२२ मध्ये जसप्रीत बुमराह हा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. टीम इंडियासाठी बुमराह ५ कसोटी सामने खेळला. यात त्याने सर्वाधिक २२ विकेट घेतल्या आहे. बांगलादेशविरुद्धच्या संघात जसप्रीत बुमराह सहभागी नव्हता. सध्या बुमराह दुखापतीतून सावरत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.