३ जानेवारीपासून भारत विरुद्ध श्रीलंका टी २० मालिकेला सुरूवात होणार आहे. यासाठी BCCI ने संघाची घोषणा केली आहे. विराट कोहलीने टी २० मधून काही काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर स्फोटक फलंदाज ऋषभ पंतला सुद्धा श्रीलंका विरुद्धच्या मालिकेमध्ये संधी देण्यात आलेली नाही. तो सातत्याने फ्लॉप ठरत असल्याने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. या दोन्ही मालिकांमध्ये विकेटकीपर म्हणून ईशान किशन याला संधी देण्यात आली आहे त्यामुळे लवकरच भारताला ईशानच्या रुपात नवा यष्टीरक्षक मिळणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
( हेही वाचा : #JioDown देशभरात जिओ सर्व्हर ठप्प! युजर्सची गैरसोय )
भारताच्या बांगलादेश दौऱ्यादरम्यान ऋषभला दुखापत झाली होती यानंतर त्याला संघातून विश्रांती देण्यात आली होती. यानंतर BCCI ने त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. के एल राहुल सुद्धा श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेत यष्टीरक्षक म्हणून खेळू शकतो. त्यामुळे BCCI आता नव्या यष्टीरक्षकाच्या शोधात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचा टी२० संघ
हार्दिक पंड्या ( कर्णधार), सूर्यकुमार यादव ( उपकर्णधार), ईशान किशन ( यष्टीरक्षक) , ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेस, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार
भारताचा एकदिवसीय संघ
रोहित शर्मा ( कर्णधार), हार्दिक पंड्या ( उपकर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल ( यष्टीरक्षक), ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंह
Join Our WhatsApp Community