Rishabh Pant Recovery : रिषभ पंत ‘या’ भावूक पोस्टमध्ये कुणाचे आभार मानतोय?

रिषभ पंतने अलीकडे बंगळुरूमध्ये आपल्या फलंदाजी प्रशिक्षकाचा वाढदिवस साजरा केला

146
Rishabh Pant Recovery : रिषभ पंत ‘या’ भावूक पोस्टमध्ये कुणाचे आभार मानतोय?
Rishabh Pant Recovery : रिषभ पंत ‘या’ भावूक पोस्टमध्ये कुणाचे आभार मानतोय?
  • ऋजुता लुकतुके

रिषभ पंतने अलीकडे बंगळुरूमध्ये आपल्या फलंदाजी प्रशिक्षकाचा वाढदिवस साजरा केला. आणि दुखापतीतून सावरण्यासाठी त्याने केलेल्या मदतीसाठी ‘त्याचे’ आभारही मानले. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये हायवेवर झालेल्या भीषण अपघातानंतर रिषभ पंत आता सावरलाय. गुडघ्याच्या लिगामेंटवर शस्त्रक्रिया केल्यानंतर आता तो पुन्हा सरावही करतोय. फलंदाजी तसंच यष्टीरक्षणाचा सरावही त्याने अलीकडेच सुरू केला आहे. आणि त्याच्या कमबॅकसाठी त्याला मदत करणाऱ्या खास व्यक्तीसाठी रिषभने एक भावूक पोस्ट लिहिली आहे. त्याच्या या खास माणसाचा १० ऑगस्टला वाढदिवस होता. ही व्यक्ती आहे बंगळुरूतील नॅशनल क्रिकेट अकॅडमीचे फलंदाजीचे कोच सीतांषू कोटक. कोटक हे सौराष्ट्र संघाचे माजी रणजी कर्णधार आहेत.

आणि सध्या व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्याबरोबर क्रिकेट अकॅडमीत काम करतात. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंत रिषभ पंत त्यांच्या बरोबरच सराव करत आहे. रिषभने स्वत: दुखापतीतून कमबॅक करण्यासाठी जिगर दाखवली आहे. कारण, कमीत कमी वेळेत तो मैदानावर जिद्दीने परतला आहे. त्यातच सीतांषू यांनीही त्याच्यावर मेहनत घेतली आहे. त्यामुळेच सीतांषू यांचा वाढदिवस रिषभला खास पद्धतीने साजरा करायचा होता. वाढदिवसाचा व्हिडिओ रिषभने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकला आहे.

(हेही वाचा – Index of Industrial Production : देशातील औद्यौगिक उत्पादन निर्देशांक ३.७ टक्क्यांपर्यंत घसरला)

https://www.instagram.com/rishabpant/?utm_source=ig_embed&ig_rid=71520306-9223-4f22-a75e-43e1df8468a0

या व्हिडिओत रिषभ पंत आणि सीतांषू कोटक यांच्याबरोबर क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष व्ही व्ही एस लक्ष्मणही दिसत आहेत. रिषभने व्हिडिओबरोबर एक छानसा संदेशही लिहिला आहे. तो म्हणतो, ‘मागचे काही महिने माझी काळजी घेतल्याबद्दल खूप सारे आभार. तुझा दिवस खूप छान जाऊदे.’ २५ वर्षीय रिषभ पंत मागचे काही महिने बंगळुरूमध्ये आहे. तिथे त्याच्यासाठी खास फिजीओ कार्यक्रम आखण्यात आला आहे. तो ताकद आणि चपळता वाढवण्याबरोबरच धावण्याचाही सराव करत आहे. उपचारांना चांगला प्रतिसाद देत आता तो फलंदाजी आणि यष्टीरक्षणही करायला लागला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.