अपघातानंतर रिषभ पंतचे पहिले ट्विट म्हणाला; माझा रिकव्हरीचा मार्ग…

81

भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत (Rishabh Pant’s Tweet) याने अपघातानंतर पहिले ट्वीट केले आहे. या कठीण काळात त्याला साथ दिल्याबद्दल त्याने चाहत्यांचे आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (Board of Control for Cricket in India) आभार मानले आहेत. पंत म्हणतो की, त्याच्या रिकव्हरीचा मार्ग खुला झाला आहे आणि तो आव्हानासाठी सज्ज आहे.

भारतीय संघाचा यष्टीरक्षक आणि फलदांज ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. पंतच्या कारचा रुरकीला जात असताना अपघात झाला. या भीषण अपघातानंतर ऋषभ पंतवर देहरादूनच्या मॅक्स हाॅस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पंतवर काही दिवसांपूर्वी कोकिलाबेन रुग्णालयात एक शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे.

( हेही वाचा: भारतीय संघाच्या अंडर 19 च्या माजी कर्णधारावर गुन्हा दाखल )

ऋषभ पंत काय म्हणाला?

या भीषण अपघातानंतर ऋषभ पंतने पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाने ट्वीट करुन सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच, माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचेही त्याने सांगितले. याशिवाय आता मी जलद रिकव्हरी करत आहेत. पुढील आव्हानासाठी स्वत:ला तयार करत आहे.

ऋषभ पंतने बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah)  यांचेही आभार मानले आहेत. तसेच, त्याने आपल्या ट्वीटमध्ये सरकारचेदेखील आभार मानले आहेत. कठीण काळात सरकारकडून खूप साथ मिळाल्याचे पंतने सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.