Rishabh, Yashasvi to Play Ranji : रिषभ, यशस्वी रणजी करंडक सामन्यांत खेळणार 

Rishabh, Yashasvi to Play Ranji : बीसीसीआयने वरिष्ठ खेळाडूंनाही रणजी खेळण्याची समज दिली आहे 

37
Rishabh, Yashasvi to Play Ranji : रिषभ, यशस्वी रणजी करंडक सामन्यांत खेळणार 
Rishabh, Yashasvi to Play Ranji : रिषभ, यशस्वी रणजी करंडक सामन्यांत खेळणार 
  • ऋजुता लुकतुके

बोर्डर – गावसकर मालिकेतील अपयशानंतर खेळाडू कसोटी क्रिकेटला महत्त्व देत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बीसीसीआयनेही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय कार्यक्रम नसताना रणजी खेळण्याची समज दिली आहे. ऑस्ट्रेलियातून परतलेल्या बहुतेक खेळाडूंना इंग्लंड विरुद्ध टी-२० मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. आणि रणजीचा नवीन टप्पा २३ जानेवारीला सुरू होणार आहे. (Rishabh, Yashasvi to Play Ranji)

(हेही वाचा- उमरग्याचे MLA Pravin Swami यांच्या आमदारकीवर संकट ? काय आहे नेमकं कारण ?)

अशावेळी रिषभ पंत आणि यशस्वी जयसवाल यांनी अनुक्रमे दिल्ली आणि मुंबई संघांसाठी आपली उपलब्धता कळवली आहे. दिल्लीचा सामना सौराष्ट्राशी होणार आहे. आणि या लढतीसाठी उपलब्ध असल्याचं रिषभ पंतने कळवलं आहे. रिषभ यापूर्वी २०१७-१८ च्या हंगामात दि्ल्लीसाठी शेवटचं खेळला होता. विराट कोहली मात्र हा सामना खेळेल की नाही, अजून स्पष्ट नाही. विराट २०१२ मध्ये आपला शेवटचा रणजी हंगाम खेळला आहे. (Rishabh, Yashasvi to Play Ranji)

दिल्लीच्या संभाव्य संघात मात्र विराट कोहलीचाही समावेश करण्यात आला आहे. ‘पंतने तो रणजी सामना खेळणार असल्याचं कळवलंय. आणि तो थेट राजकोटमध्येत संघात शामील होणार आहे. विराटने खेळावं अशी आमची इच्छा आहे. पण, त्याने अजून त्याविषयी कळवलेलं नाही. तर हर्षित राणाचा टी-२० संघात समावेश असल्यामुळे तो ही लढत खेळू शकणार नाही,’ असं दिल्ली असोसिएशनच्या प्रवक्त्यांनी कळवलं आहे. (Rishabh, Yashasvi to Play Ranji)

(हेही वाचा- BMC Elections 2025 : पंतप्रधान मोदींचा महायुतीच्या आमदारांशी होणार संवाद; आगामी बीएमसी निवडणुकांसाठी महत्त्वपूर्ण तयारी)

शुभमन गिल आणि यशस्वी जयसवालही अनुक्रमे पंजाब आणि मुंबईकडून रणजी खेळतील. दोघांचा टी-२० मालिकेसाठी विचार झाला नाही, तेव्हाच रणजी खेळण्यासाठी त्यांना वेळ दिल्याचं बोललं जात होतं. ऑस्ट्रेलियातील मालिकेसाठी भारतीय संघाची तयारी कमी पडल्याचा आरोप झाला होता. रवी शास्त्री आणि सुनील गावसकर यांनीही उघडपणे तसं बोलून दाखवलं होतं. रोहीत शर्मानेही मुंबई रणजी संघाबरोबर सरावाला सुरुवात केली आहे.  (Rishabh, Yashasvi to Play Ranji)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.