यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishbh pant) रस्ते अपघातानंतर वर्षभरापेक्षा जास्त काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. पण, संधी मिळेल तेव्हा तो आपल्या माजी संघ सहकाऱ्यांबरोबर वेळ घालवतो. आताही तो बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीत आहे. आणि भारतीय संघही तिसऱ्या टी-२० सामन्याच्या निमित्ताने तिथेच आहे. तेव्हा चिन्नास्वामी मैदानातील (ChinnaswamyInd Stadium) सरावावेळी रिषभही काही काळासाठी तिथे आला होता. ( Ind vs Afg 3rd T20)
रिषभ पंत विराटबरोबर गप्पा मारताना दिसला. आणि रिंकू सिंगशीही त्याने काही काळ संवाद साधला. संघाबरोबर त्याने थोडाफार फलंदाजीचाही आनंद लुटला. रिषभ पंत जवळ जवळ दीड वर्षानंतर आयपीएल दरम्यान क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार आहे. ( Ind vs Afg 3rd T20)
Virat Kohli and Rishabh pant at ChinnaswamyInd Stadium 😍🔥 pic.twitter.com/VnjwvBOnTo
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) January 16, 2024
डिसेंबर २०२२ मध्ये दिल्लीजवळ यमुना एक्सप्रेसवेवर त्याच्या गाडीला अपघात झाला होता. त्यानंतर तो क्रिकेट खेळलेला नाही. आणि सध्या बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीत तो रिहॅबिलिटेशनमध्ये गुंतला आहे. रिषभ पंत २६ वर्षांचा आहे. आणि यष्टीरक्षक म्हणून संघात परतण्याचा आता त्याचा प्रयत्न असेल.
(हेही वाचा : Ind vs Afg 3rd T20 : भारताला हवाय टी-२० मालिकेचा परिपूर्ण शेवट)
बुधवारी १७ जानेवारीला भारताचा तिसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानबरोबर मुकाबला आहे. आणि हा सामना जिंकून मालिका ३-० अशी खिशात टाकण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community