- ऋजुता लुकतुके
दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर टेनिसच्या मैदानावर जिंकल्यानंतर आणि हरल्यानंतरही आपल्या भावनांना मोकळी वाट करून देण्यासाठी प्रसिद्ध होता. अगदी त्याच शैलीत डार्टमाऊथ विद्यापीठाच्या पदवीदान समारंभातही त्याने हातचं काही राखून न ठेवता भाषण दिलं. स्वत: फेडररने उच्च माध्यमिक स्तरावर शाळा सोडली. आपल्या भाषणाची सुरुवातही फेडररने तशीच केली आहे. ‘मी फक्त दुसऱ्यांदा कॉलेजची पायरी चढतोय आणि माझे दोन शब्द ऐकून घेताना हे कायम लक्षात ठेवा,’ असं तो सुरुवातीला म्हणतो. आणि तिथून पुढे टेनिस विश्वातील आपले अनुभव त्याने बेमालूमपणे कॉलेज विश्वातील मुलांना आवडतील, रुचतील असे सांगितले आहेत. (Roger Federer)
फेडररचं ८ जूनचं हे भाषण आहे. पण, सोशल मीडियावर सध्या चांगलंच व्हायरल होतंय. पहिला प्रश्न त्याने मुलांना विचारला, ‘मी माझ्या कारकीर्दीत १,५२६ सामने जिंकले. माझी यशाची टक्केवारीही ८० टक्के होती. पण, यात मी नेमके किती गुण मिळवले? म्हणजे किती गुण मी जिंकले? याचं उत्तर फक्त ५४ टक्के असं आहे. अगदी कारकीर्दीच्या सर्वोच्च स्थानी असतानाही मला इतकेच गुण मिळत होते,’ असं फेडरर मुद्दा संपवताना म्हणाला. (Roger Federer)
This is a MUST WATCH. 😭
Watch highlights from @rogerfederer’s Dartmouth Commencement speech.
(via @dartmouth) pic.twitter.com/Qf2c0ad9cM
— Tennis Channel (@TennisChannel) June 10, 2024
(हेही वाचा – Indian Football News : माजी राष्ट्रीय प्रशिक्षक इगॉर स्टिमॅकवर भारतीय फुटबॉल फेडरेशन का भडकली?)
सुरुवातीला हे भाषण फक्त डार्टमाऊथ विद्यापीठाच्या फेसबुक, इन्स्टाग्राम चॅनलवर होतं. पण, आता ते चांगलंच व्हायरल झालं आहे. जवळ जवळ १५ लाख लोकांनी ते पाहिलंय. आपण खेळलेल्या कठीण सामन्यांचा उल्लेखही फेडररने अगदी नेमकेपणाने केला आहे आणि त्यातून नवीन तरुणांना मोलाचा सल्ला दिला आहे. फेडररच्या या भाषणाची तुलना कॅनन ओ-ब्रायन, डेव्हिड फोस्टर वॅलेस आणि मेरी स्मिश यांच्याशी केली जात आहे. फेडररने वैयक्तिक आयुष्यात शिक्षण सोडून टेनिसवर लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं. टेनिसमध्ये कारकीर्दही घडवली. त्याच्या नावावर २० ग्रँडस्लॅमसह १०३ एकेरी विजेतेपदं आहेत. (Roger Federer)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community