- ऋजुता लुकतुके
भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपान्नाने (Rohan Bopanna) अलीकडेच ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. त्यामुळे जागतिक क्रमवारीत तो पुरुष दुहेरीत अव्वल स्थानावरही पोहोचला. आता बोपान्नाला निवडक स्पर्धांवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. आणि त्याची नजर जुलै महिन्यात होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकवर रोखलेली आहे. (Rohan Bopanna)
‘मला अगदी तरुण झाल्यासारखं वाटतंय. जुलै महिन्यात ऑलिम्पिक आहे. आणि त्यापूर्वी फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि मार्स्टर्स स्पर्धा आहेत. या सगळ्याच खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्या खेळून ऑलिम्पिकसाठी तयारी करण्याचं माझं उद्दिष्टं आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताचा एखाद दुसरा खेळाडू नाही तर अख्खा संघ असणारए ही कल्पनाही सुखावणारी आहे,’ असं बोपान्ना (Rohan Bopanna) एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला. (Rohan Bopanna)
Bopanna sets sight on Paris Olympics after Australian Open triumph
Read @ANI Story | https://t.co/sPhSEkvwlx#RohanBopanna #Bopanna #AustralianOpen2024 #GrandSlam #BopannaEbden #ParisOlympics #ParisOlympics2024 pic.twitter.com/0A94ct8HqD
— ANI Digital (@ani_digital) February 12, 2024
(हेही वाचा – Ind vs Eng 3rd Test : इंग्लंडचा फिरकी गोलंदाज रेहान अहमदलाही भारतात विमानतळावर अडवलं?)
सुरुवात छान झाल्यामुळेच नवीन हंगामासाठी हुरुप आला – बोपान्ना
या हंगामाची सुरुवातच बोपान्नासाठी संस्मरणीय ठरली आहे. ऑस्ट्रेलियन ओपनचं दुहेरीतील विजेतपद हे स्पर्धेतील त्याचं पहिलं आणि ग्रँडस्लॅम स्पर्धांमधील तिसरं विजेतेपद होतं. शिवाय पहिल्यांदाच त्याला जागतिक स्तरावर अव्वल स्थान मिळवून देणारं हे विजेतेपद ठरलं आहे. ‘दोन आठवडे झाले त्या विजयाला. पण, अजूनही खरंच वाटत नाही. सुरुवात अशी छान झाल्यामुळेच नवीन हंगामासाठी हुरुप आला आहे,’ असं बोपान्नाने या मुलाखतीत सांगितलं. (Rohan Bopanna)
सात वर्षांनंतर बोपान्नाला (Rohan Bopanna) ग्रँडस्लॅम स्पर्धेत असं निर्भेळ यश मिळालं. पण, आता त्याने नवीन सुरुवात केल्याची भावना त्याच्यात आहे. ऑलिम्पिकमध्ये लिअँडर पेसच्या वैयक्तिक कांस्य पदकानंतर भारताला पुन्हा एकदा यश मिळवून देण्याचा त्याचा मानस आहे. (Rohan Bopanna)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community