ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेला सुरुवात झाली तेव्हा रोहन बोपान्ना (Rohan Bopanna) पुरुषांच्या क्रमवारीत जागतिक दुहेरीत तिसऱ्या क्रमांकावर होता. आता ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एबडनच्या साथीने स्पर्धेची उपान्त्य फेरी गाठतानाच त्याने शिरपेचात आणखी एक तुरा खोवला आहे. दुहेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्यांदाच त्याने अव्वल स्थान पटकावलं आहे. येत्या सोमवारी (२९ जानेवारी) आंतरराष्ट्रीय टेनिस असोसिएशनकडून जागतिक क्रमवारी जाहीर होईल तेव्हा तो अधिकृतपणे अव्वल स्थानावर विराजमान होईल.
टेनिसमध्ये वयाने सर्वात ज्येष्ठ नंबर वन होण्याचा विक्रमही त्याने रचला आहे.
Congratulations to our pride @rohanbopanna on achieving Men’s Doubles World No. 1 Rank 👏
Truly unstoppable! We are so proud of you! 🇮🇳
@AITA__Tennis pic.twitter.com/YgZ1jx5nqH— Dr. Anil Jain (@aniljaindr) January 24, 2024
उपउपान्त्य फेरीच्या सामन्यात बोपान्ना (Rohan Bopanna) आणि एबडन जोडीने अर्जेंटिनाच्या मॅक्झिमो गोन्झालेस आणि आंद्रेस मोलटेनी या जोडीचा ६-४, ७-६ असा पराभव केला. सामन्यावर बोपान्ना – एबडन जोडीने पूर्ण वर्चस्व गाजवलं. एक तास ४६ मिनिटांत ही लढत खिशात टाकली.
कामगिरीचा खूप अभिमान वाटतोय –
या विजयानंतरच बोपान्नाचं (Rohan Bopanna) अव्वल स्थान निश्चित झालं. सामन्यानंतर बोपान्ना त्यामुळे भारावलेल्या अवस्थेत होता. ‘या कामगिरीचा खूप अभिमान वाटतोय. माझे कुटुंबीय माझ्याबरोबर असताना ही कामगिरी करू शकलो, याचा जास्त आनंद आहे. त्यांनी, माझ्या प्रशिक्षकांनी आणि मी सुद्धा त्यासाठी केलेले त्याग आज कामी आले,’ ही बोपान्नाची सुरुवातीची प्रतिक्रिया होती.
(हेही वाचा – रामललाच्या आरतीसाठी आली देशभरातील पारंपरिक वाद्य)
आणि त्यानंतर या कामगिरीमुळे भारतात तरुणांना टेनिसकडे वळण्याची प्रेरणा मिळेल, असं त्याने बोलून दाखवलं.
पत्रकारांनीही आमच्याकडे पाठ फिरवली होती –
‘अलीकडे भारतीय टेनिसमध्ये काहीच विशेष घडत नव्हतं. पत्रकारांनीही आमच्याकडे पाठ फिरवली होती. अशावेळी माझी ही बातमी आल्यावर लोकांचं लक्ष टेनिसकडे वळेल आणि तरुण हा खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित होती अशीच आशा आहे,’ असं बोपान्नाने (Rohan Bopanna) बोलून दाखवलं.
(हेही वाचा – Ind vs Eng 1st Test : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत संघांदरम्यान रंगतील ही ३ द्वंद्व)
बोपान्नाचं (Rohan Bopanna) यापूर्वीचं क्रमवारीतील सर्वोत्तम स्थान होतं ते तिसरं, २०१३ मध्ये तो पहिल्यांदा तिसऱ्या स्थानावर पोहोचला होता. तर दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणारा आता तो चौथा भारतीय आहे. यापूर्वी लिअँडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांनी ही कामगिरी केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community