Rohit Hardik Hug : रोहित हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी सज्ज, सरावाच्या वेळी दोघांनी दिलं आलिंगन

152
Rohit Hardik Hug : रोहित हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी सज्ज, सरावाच्या वेळी दोघांनी दिलं आलिंगन
Rohit Hardik Hug : रोहित हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी सज्ज, सरावाच्या वेळी दोघांनी दिलं आलिंगन
  • ऋजुता लुकतुके

काही महिन्यांपूर्वी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) फ्रँचाईजीने लिलावाच्या आधीच्या व्यवहारांमध्ये गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याला विकत घेतलं. इतकंच नाही तर रोहितच्या पुढे त्याला संघाचा कर्णधारही केलं. त्यामुळे आयपीएलसाठी संघ एकत्र आला तेव्हा रोहीत आणि हार्दिक यांच्यात काय देवाण घेवाण होते याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. (Rohit Hardik Hug)

हार्दिकने आधीच रोहित आपला सीनिअर खेळाडू आहे आणि त्याला त्याचा मान मिळेल, असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) सरावाच्या वेळी दोन्ही खेळाडूंमध्ये खेळीमेळीचं वातावरणही दिसून आलं. दोघांनी एकमेकांना आधी आलिंगन दिलं. आणि मग गप्पाही मारल्या. (Rohit Hardik Hug)

(हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्र काँग्रेसकडून ‘या’ १२ उमेदवारांची घोषणा)

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) एक व्हीडिओ आपल्या इन्स्टाग्राम साईटवर टाकला आहे. आणि त्यात हार्दिक रोहीतला पाहून स्वत: समोर येतो आणि त्याला मिठी मारतो, असं दृश्य आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

(हेही वाचा – Indian Army : भारतीय लष्कराने सुरू केली लष्करी युवती क्रीडा कंपनी)

‘दोघांनी एकमेकांना आलिंगन तर दिलंच. शिवाय एकमेकांशी ५-१० मिनिटं गप्पाही मारल्या. रोहित मुंबई फ्रँचाईजीने आयोजित केलेल्या संघ मेळाव्यासाठी अलिबागला जाऊ शकला नव्हता. त्या कालावधीत रोहितला फलंदाजीचा सराव करायचा होता. रोहित सोमवारी मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला आहे. आणि तेव्हापासून न चुकता तो फलंदाजीचा सराव करत आहे,’ असं संघ प्रशासनाने मीडियाशी बोलताना सांगितलं. (Rohit Hardik Hug)

हार्दिकने मंगळवारी मीडियाशी बोलताना रोहितच्या संघातील स्थानाबद्दल भाष्य केलं होतं. ‘आम्ही दोन महिने एकमेकांना फारसे भेटलेलो नाही. तो क्रिकेट खेळतोय. आणि प्रवासही करतोय. पण, आता दोन महिने एकत्र खेळणार आहोत. संघातील त्याची जागा भक्कम आहे, जशी ती भारताच्या राष्ट्रीय संघातही आहे,’ असं उत्तर हार्दिकने तेव्हा दिलं होतं. (Rohit Hardik Hug)

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ बुधवारी एका दिवसाच्या अलिबाग सहलीला गेला होता. पण, राष्ट्रीय संघातून नुकतेच मोकळे झालेले रोहित आणि जसप्रीत बुमराह या सहलीसाठी संघाबरोबर नव्हते. जसप्रीतही गुरुवारी संघात दाखल होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.