- ऋजुता लुकतुके
महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्ज संघाची कप्तानी सोडल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सोशल मीडियावर धोणीसाठी एक भावपूर्ण संदेश लिहिला आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि भारतीय कर्णधार म्हणून धोनीने (MS Dhoni) बजावलेल्या कामगिरीचा गौरव रोहितने या संदेशातून केला आहे. (Rohit on Dhoni)
(हेही वाचा- Mazgaon Tadwadi ताडवाडीतील त्या कुटुंबांची नरकयातना संपवा, पुनर्विकास होईपर्यंत माझगावमध्ये पर्यायी पुनर्वसन करा)
आयपीएलमध्ये धोनीची कामगिरीच तशी आहे. चेन्नई संघाचं त्याने २१२ सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. आणि यात संघाला १२८ विजय मिळवून दिले आहेत. धोनी मागची तब्बल १७ वर्षं चेन्नई संघाचं नेतृत्व करत होता. त्यामुळे त्याच्या निवृत्तीमुळे या स्पर्धेतील एका कालखंडाचा अंत मानला जात आहे. कारण, एकतर प्रदीर्घ काळ केलेलं नेतृत्व आणि त्यात विक्रमी पाचवेळा फ्रँचाईजीला मिळवून दिलेलं विजेतेपद. (Rohit on Dhoni)
इन्स्टाग्राम स्टोरीत रोहितने (Rohit Sharma) धोनीबरोबरचा (Rohit on Dhoni) हस्तांदोलन करतानाचा फोटो टाकला आहे. आणि खाली हस्तांदोलनाचाच इमोजीही दिला आहे. क्रिकेटमध्ये धोनीबद्दल असलेला आदर आणि कौतुक याच भावना रोहितने यातून व्यक्त केल्या आहेत. (Rohit on Dhoni)
ऑगस्ट २०२० मध्ये धोनीने (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. राष्ट्रीय संघासाठीही धोनीचं नेतृत्व क्रिकेटमधील एक उदाहरण ठरलं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक तसंच आयसीसी चॅम्पियन्स करंडक अशा तीनही आयसीसी स्पर्धा जिंकल्या. (Rohit on Dhoni)
(हेही वाचा- Air India : डीजीसीएने ठोठावला एअर इंडियाला तब्बल ८० लाखांचा दंड; कारण …)
तर त्याची फ्रँचाईजी चेन्नई सुपरकिंग्जसाठी (CSK) धोनी हा परिसस्पर्श देणारा ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने गेल्यावर्षी विक्रमी पाचवं विजेतेपद पटकावलं. तर आयपीएलमध्ये (IPL 2024) चेन्नई आणि महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) हे समीकरण न खोडता येण्यासारखं आहे. (Rohit on Dhoni)