Rohit Sharma : रोहित शर्माचा वारसदार ठरवण्याची वेळ आली आहे का?

Rohit Sharma : न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर रोहित आणखी किती काळ खेळेल याबद्दल अनिश्चितता आहे. 

74
Rohit Sharma : रोहित शर्माचा वारसदार ठरवण्याची वेळ आली आहे का?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकला तेव्हा भारतीय संघ विजयारथावर आरुढ होता. त्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) किंवा विराट कोहलीची निवृत्ती तेव्हा चर्चेतही नव्हती. उलट दोघं आणखी २-३ वर्षं खेळू शकतील असं बोललं जात होतं. पण, आता अचानक परिस्थिती बदलली आहे. न्यूझीलंड विरुद्ध धरच्या मैदानावर झालेली खराब कामगिरी आणि पुढे उभं असलेलं ऑस्ट्रेलियाचं खडतर आव्हान यामुळे रोहित शर्मा पुढील वर्षी निवृत्त होणार का अशी चर्चा रंगू लागली आहे. खासकरून ऑस्ट्रेलियातही पराभव झाला तर रोहित शर्मा तडकाफडकी राजीनामा देईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.

(हेही वाचा – Uttarakhand मधील अपघातग्रस्तांची मोहम्मद आमिरने फेसबुकवर उडवली खिल्ली; हिंदूंकडून संताप)

आणि तसं झालं तर बीसीसीआयने रोहित शर्माचा वारसदार आधीच ठरवून ठेवावा असा सल्ला माजी क्रिकेटपटू कृष्णम्माचारी श्रीकांतने दिला आहे. भारताला टी-२० विश्वचषकात विजेतेपद मिळवून दिल्यावर रोहित शर्माने (Rohit Sharma) या प्रकारातून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्येही रोहितचा फॉर्म लौकिकाला साजेसा नाही. त्यातच न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या ०-३ पराभवामुळे त्याच्या कप्तानीतील त्रुटीही समोर आल्या आहेत.

(हेही वाचा – Financial Changes : नोव्हेंबरपासून क्रेडिट कार्डाचे शुल्क वाढणार, आणखी कोणते नियम बदलणार?)

आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिली कसोटी खेळणार नाहीए. तर दुसऱ्या कसोटीत त्याच्या समावेशाबद्दल अनिश्चितता आहे. तेव्हा उपकर्णधार जसप्रीत बुमराह संघाचं नेतृत्व करणार असला तरी संघाकडे रोहितच्या वारसदाराविषयी कायमस्वरुपी योजना हवी, असं श्रीकांत यांना वाटतं. ‘तुम्ही वेळेच्या पुढे विचार करायला हवा. रोहित आगामी दोन कसोटींसाठी उपलब्ध नसेल आणि एकंदरीत त्याच्या फॉर्मविषयी शंका असतील तर त्याचा वारसदार आधीच ठरवायला हवा. कारण, रोहितची ऑस्ट्रेलियातील कामगिरी खराब असेल तर तो स्वत:च निवृत्त होईल आणि नेतृत्वाचे निर्णय अचानक घेता येत नाहीत,’ असं श्रीकांत यांनी बोलून दाखवलं. एकीकडे जसप्रीत बुमराहला संघाचा उपकर्णधार करण्यात आलंय आणि दुसरीकडे, शुभमन गिलला दीर्घकालीन नेतृत्वाचा पर्याय म्हणून तयार केलं जात आहे. पण, संघाबरोबरच क्रिकेटच्या एकूण मोठ्या परिवाराला बीसीसीआयची योजना वेळेत समजली पाहिजे, असं श्रीकांत यांचं म्हणणं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.