Rohit Sharma चा मुंबईत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सराव सुरू

Rohit Sharma : ऑस्ट्रेलियाहून परतल्यापासून रोहित मुंबईत संघाबरोबर सराव करत आहे

34
Rohit Sharma चा मुंबईत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सराव सुरू
Rohit Sharma चा मुंबईत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सराव सुरू
  • ऋजुता लुकतुके

आगामी एकदिवसीय मालिका तसंच चॅम्पियन्स करंडकासाठी बीसीसीआय आणि निवड समितीने रोहित शर्मावरच नेतृत्वासाठी विश्वास दाखवला असला तरी फलंदाज म्हणून त्याचं अपयश सलणारंच आहे. ऑस्ट्रेलियात ३ कसोटींमध्ये ६ च्या सरासरीने त्याने फक्त ३१ धावा केल्या आहेत. त्यामुळे मालिकेतील शेवटच्या सिडनी कसोटीत त्याला वगळावं लागलं होतं. त्यानंतर आता रोहित मुंबईतच आपल्या फलंदाजीवर विशेष मेहनत घेत आहे. मागचे तीन दिवस तो मुंबई रणजी संघाबरोबर सराव करत आहे.  (Rohit Sharma)

(हेही वाचा- SSC & HSC Board Exam 2025 : दाहवी- बारावीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख; शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह)

इंग्लंड विरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना ६ फेब्रुवारीला नागपूर इथं होणार आहे. आणि या सामन्यातून फॉर्म दाखवून देण्याचा त्याचा प्रयत्न असेल. एरवी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३ द्विशतकं करणारा तो एकमेव फलंदाज आहे. पण, सध्या तो खराब फॉर्ममधून जात आहे. इंग्लंड विरुद्धची मालिका १२ तारखेला संपल्यानंतर लगेचच भारतीय संघ चॅम्पियन्स करंडकासाठी दुबईला रवाना होणार आहे. तिथे २० तारखेला भारताचा पहिला सामना होईल. त्यापूर्वी रोहितने स्वत: आपल्या सरावाचा एक व्हीडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (Rohit Sharma)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

 रोहितने सरावादरम्यान मधल्या यष्टीवर स्टान्स घेतला आहे. तेज गोलंदाजांना तो मनमुराद फटके लगावताना दिसतोय. त्याचा आवडता पूल फटकाही त्याने सढळपणे वापरला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने जून २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकला आहे. तर रोहित आपला शेवटचा एकदिवसीय सामना ऑगस्ट २०२४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला आहे. सध्या खराब फॉर्ममध्ये असला तरी रोहितने २६५ एकदिवसीय सामन्यांत भारतासाठी १०,८६६ धावा केल्या आहेत. यात ३१ शतकं आणि ५७ अर्धशतकांचा समावेश आहे. (Rohit Sharma)

हेही वाचा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.