-
ऋजुता लुकतुके
रोहित शर्माने (Rohit Sharma) बांगलादेशविरुद्ध भारताला वेगवान सुरुवात करून दिली. यात त्याने ३६ चेंडूंत ४१ धावा केल्या. त्याचवेळी रोहितने (Rohit Sharma) एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११,००० धावांचा टप्पाही पूर्ण केला. हा टप्पा वेगाने पूर्ण करणारा तो दुसऱ्या क्रमांकावरील फलंदाज आहे. रोहितचा हा २६१ वा एकदिवसीय डाव होता. यापूर्वी विराटने २२२ व्या डावांत ११,००० धावांचा टप्पा पार केला होता. विराटनंतर आता रोहितच (Rohit Sharma) वेगवान ११,००० धावा करणारा फलंदाज आहे.
सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) या टप्प्यासाठी २७६ डाव लागले होते. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रोहितला या मापदंडासाठी फक्त २६ धावा हव्या होत्या. भारतीय डावाच्या चौथ्या षटकातच मुस्तफिझुर रहमानच्या (Mustafizur Rahman) षटकात चौकार वसूल करत रोहितने (Rohit Sharma) ११,००० धावा पूर्ण केल्या.
(हेही वाचा – International Mother Language Day म्हणजेच आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन का साजरा केला जातो?)
1⃣1⃣,0⃣0⃣0⃣ ODI runs and counting for Rohit Sharma! 🙌🙌
He becomes the fourth Indian batter to achieve this feat! 👏👏
Follow the Match ▶️ https://t.co/ggnxmdG0VK#TeamIndia | #BANvIND | #ChampionsTrophy | @ImRo45 pic.twitter.com/j01YfhxPEH
— BCCI (@BCCI) February 20, 2025
(हेही वाचा – Champions Trophy, Ind vs Ban : रोहित शर्माने झेल सोडून अक्षरची हॅट ट्रीक हुकवली तो क्षण)
सर्वात जलद ११,००० धावा करणारे फलंदाज
विराट कोहली – २२२ डाव
रोहित शर्मा – २६१ डाव
सचिन तेंडुलकर – २७६ डाव
रिकी पाँटिंग – २८६ डाव
सौरव गांगुली – २८८ डाव
रोहित (Rohit Sharma) बांगलादेशविरुद्ध ४१ धावा करून बाद झाला. पण, भारताने हा सामना ६ गडी राखून जिंकला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community