टी-२० क्रिकेटमधले फलंदाजीचे जवळ जवळ सगळे विक्रम सध्या भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर आहेत. सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय धावा (३९९८) त्याच्या नावावर आहेत. सर्वाधिक षटकार त्यानेच ठोकलेत. कर्णधार म्हणूनही तो भारताचा सर्वाधिक यशस्वी टी-२० कर्णधार (४२ विजय) आहे. या जोडीला आता अफगाणिस्तान विरुद्ध आपलं पाचवं टी-२० शतक ठोकून त्याने नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे. ( Ind vs Afg 3rd T20)
जागतिक स्तरावर सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय शतकं आता त्याच्या नावावर आहेत. बंगळुरूमध्ये पाचवं शतक ठोकताना रोहितने भारतीय धावसंख्या ४ बाद २२ वरून ४ बाद २१२ वर नेण्याची किमयाही केली. ( Ind vs Afg 3rd T20 )
🎥 That Record-Breaking Moment! 🙌 🙌@ImRo45 notches up his 5⃣th T20I hundred 👏 👏
Follow the Match ▶️ https://t.co/oJkETwOHlL#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ITnWyHisYD
— BCCI (@BCCI) January 17, 2024
१४ महिन्यांनंतर आपली पहिली टी-२० मालिका खेळताना रोहित शर्मा पहिल्या दोन सामन्यात भोपळाही फोडू शकला नव्हता. आणि इथंही फरीद अहमदच्या गोलंदाजीवर तो थोडासा चाचपडत खेळत होता. पण, दुसऱ्या बाजूने यशस्वी, विराट, शिवम आणि संजू सॅमसन हे फलंदाज बाद होत गेल्यावर रोहित ने धावसंख्या वाढवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. रिंकू सिंग सह पाचव्या गड्यासाठी त्याने नाबाद १९० धावांची भागिदारी रचली. यात रोहितच्या धावा १२१. ६९ चेंडूंत त्याने ८ षटकार आणि ११ चौकार लगावले. आणि त्याचबरोबर आपलं पाचवं टी-२० शतक पूर्ण केलं. ( Ind vs Afg 3rd T20 )
टी-२० क्रिकेटमध्ये पाच आंतरराष्ट्रीय शतकं करणारा तो पहिला फलंदाज आहे. त्याच्या खालोखाल सुर्यकुमार यादव आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल हे दोन फलंदाज प्रत्येकी ४ शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. आजच्या खेळीने भारतीय कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या सर्वाधिक १,५७० धावांचा विक्रमही रोहीतने आता मागे टाकला आहे.
हेही पहा –