काल म्हणजेच रविवार २२ ऑक्टोबर रोजी धरमशाला येथे झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध भारत या सामन्यात भारताने ‘विराट’ विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघ न्यूझीलंडच्या विजयाचा अश्वमेध रोखत गुणतालिकेत पुढे गेला आहे. विराट कोहलीच्या झुंजार खेळीच्या जोरावर भारताने वर्ल्डकपमधील सलग पाचव्या विजयाची नोंद केली. २००३ नंतर भारत वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकदाही विजयी झाला नव्हता. मात्र या विजयाने भारताने न्यूझीलंडची विजयी घोडदौड रोखली आहे. ४ गडी राखून भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाने (Rohit Sharma) अनेक विक्रम मोडले आहेत.
अशातच या वर्ल्ड कपमध्ये हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नावावर एका नवीन विक्रमाची नोंद झाली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) एकदिवसीय विश्वचषकामधील कामगिरी उल्लेखनीय आहे. रोहितने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात दोन षटकार ठोकताच एबी डिव्हिलियर्सचा मोठा विक्रम मोडीत काढला. त्यामुळे एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारा रोहित शर्मा आता दुसरा फलंदाज ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा क्रिकेटर ख्रिस गेल असून त्याने ३५ सामन्यांत ४९ षटकार मारले आहे.
Most ODI sixes in a calendar year since 2017:
46 – R Sharma in 2017
39 – R Sharma in 2018
56 – C Gayle in 2019
22 – G Maxwell in 2020
17 – P Stirling in 2021
27 – Pooran in 2022
47* – R Sharma in 2023HITMAN – The Only Indian 💙🏏#RohitSharma #CricketTwitter pic.twitter.com/1SMSyUGwRE
— Ishan Joshi (@ishanjoshii) October 17, 2023
(हेही वाचा – Allahabad University : …तर मी प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्ण पाठवले असते; अलाहाबाद विद्यापीठातील प्राध्यापकाची दर्पोक्ती)
एकदिवसीय विश्वचषकाच्या (Rohit Sharma) इतिहासात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. त्या खालोखाल आता भारताचा रोहित शर्मा असून त्याने २२ सामन्यांत ४० षटकार, तर तिसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स असून त्याने २३ सामन्यांत ३७ षटकार, तसेच ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग याने ४६ सामन्यांत ३१ षटकार आणि पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर ब्रेंडन मॅक्युलम असून त्याने ३४ सामन्यांत २९ षटकार मारले आहेत. (Rohit Sharma)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community