Rohit Sharma Heir : रोहित शर्माचा वारसदार नेमका कोण? बीसीसीआयची नजर ‘या’ दोन नावांवर

Rohit Sharma Heir : जसप्रीत बुमराह या दोन नावांमध्ये सध्या दिसत नाही.

126
Rohit Sharma Heir : रोहित शर्माचा वारसदार नेमका कोण? बीसीसीआयची नजर 'या' दोन नावांवर
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार रोहित शर्मा सध्या फलंदाजी आणि नेतृत्वाच्या बाबतीतही अडखळतो आहे. फलंदाजीत त्याची कामगिरी लौकिकाला साजेशी होत नाहीए. तर एकदिवसीय आणि कसोटींत निकालही त्याच्या विरोधात गेले आहेत. शिवाय तो ३७ वर्षांचा असल्यामुळे आणखी किती काळ तो संघात टिकून राहणार हा प्रश्नही आहेच. त्यामुळे निवड समिती सध्या रोहित शर्मचाा वारसदार शोधण्याच्या मोहिमेवर आहे. भारताचे कसोटी, एकदिवसीय आणि अगदी टी-२० उपकर्णधारही त्या दृष्टीने अलीकडे बदलले आहेत. कारण, ही एका अर्थाने नवीन कर्णधारासाठीची परीक्षाच आहे. (Rohit Sharma Heir)

(हेही वाचा – ICC T20 Rankings : अभिषेक शर्मा ३८ स्थानांची झेप घेऊन आयसीसी क्रमवारीत थेट दुसऱ्या स्थानावर )

पण, बीसीसीआयच्या रडारवर सध्याचा एकही उपकर्णधार नाही तर रिषभ पंत किंवा यशस्वी जयस्वाल ही दोन नावं कर्णधार म्हणून समोर असल्याची एक बातमी टाईम्स वृत्तसमुहाने दिली आहे. खरंतर कसोटीत जसप्रीत बुमराहने कर्णधार म्हणूनही स्वत:ला सिद्ध केलं आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो उपकर्णधार होता आणि रोहितच्या अनुपस्थितीत पर्थ कसोटीत त्याने नेतृत्व करताना भारताला २९५ धावांनी विजयही मिळवून दिला. पण, त्याला वारंवार होणाऱ्या दुखापती पाहता ५ कसोटींची मोठी मालिका तो नियमितपणे खेळू शकेल का हा प्रश्न आहे आणि त्यामुळे बुमराह हे नाव सध्या बीसीसीआयसाठी दूरचं आहे. (Rohit Sharma Heir)

(हेही वाचा – Ind vs Eng 1st ODI : Virat Kohli इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर ; कारण आलं समोर)

दुसरा एक पर्याय शुभमन गिलचा आहे. पण, सध्या त्याचा फॉर्म खराब आहे आणि मोठी धावसंख्या रचण्यात तो कमी पडला आहे. त्यामुळे त्याच्यावर बीसीसीआयला पुरेसा विश्वास नाही. ‘बुमरा ५ कसोटींची मालिका सलग खेळू शकेल का, याची खात्री बीसीसीआयला वाटत नाही. नाहीतर तोच कर्णधारपदासाठी योग्य होता. तर शुभमन गिलवरही त्यांचा विश्वास होता. पण, अलीकडे कसोटीत शुभमन गिलने चांगली कामगिरी केलेली नाही. त्यामुळे सध्या बीसीसीआयची नजर आहे ती रिषभ पंतवर. किंवा यशस्वी जयस्वालही दूरचा पर्याय होऊ शकतो,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. दरम्यान, सध्या रोहित शर्माच एकदिवसीय मालिका आणि चॅम्पियन्स करंडकात संघाचं नेतृत्व करणार आहे. आणि नागपूरमध्ये पत्रकारांनी त्याला निवृत्तीवरून छेडलं असता, रोहित चिडलेला दिसला. त्याने हा प्रश्नच उडवून लावला. आणि सध्या समोरच्या आव्हानावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सांगितलं. ‘हा प्रश्न आता येतोच कुठे,’ असा त्याचा दावा होता. (Rohit Sharma Heir)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.