- ऋजुता लुकतुके
मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ यंदाच्या आयपीएलमध्ये १ एप्रिलला आपला पहिला घरच्या मैदानावरील सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी संघ हैद्राबादहून मुंबईत आला तेव्हा चाहत्यांनी रोहित शर्माचं जोरदार स्वागत केलं. ‘देखो. वह आ गया,’ असं विमानतळावर जमलेले लोक म्हणत होते आणि त्यांनी ‘रोहित, रोहित’ असा जल्लोषही केला. काही चाहते रोहीतच सर्वोत्तम आहे, अशाही घोषणा देत होते. (Rohit Sharma in Mumbai)
(हेही वाचा- Rameshwaram Cafe Blast : रामेश्वर कॅफे स्फोटाच्या २ आरोपींचे फोटो जारी; माहिती देणाऱ्यांना १० लाखांचे बक्षीस)
अलीकडेच मुंबई फ्रँचाईजीने रोहित शर्माला (Rohit Sharma in Mumbai) कप्तानीवरून हटवून गुजरातहून मुंबई इंडियन्सकडे (Mumbai Indians) आलेल्या हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) कप्तानी सोपवली होती. पण, चाहत्यांना संघाचा निर्णय रुचलेला नाही. सोशल मीडियावरही रोहितला चांगला पाठिंबा मिळताना दिसत आहे. शिवाय पहिल्या दोन्ही सामन्यात मुंबईचा पराभव झाल्यानंतर हार्दिकच्या नेतृत्वाचीही कसोटी लागली आहे. (Rohit Sharma in Mumbai)
Dekho 𝒘𝒐𝒉 aa gaya ❤️🔥#MumbaiMeriJaan #MumbaiIndians | @ImRo45 pic.twitter.com/FXIbjbe0jC
— Mumbai Indians (@mipaltan) March 29, 2024
मुंबई विमानतळावरील (Mumbai Airport) रोहितचा (Rohit Sharma in Mumbai) व्हीडिओ तर मुंबई इंडियन्स फँचाईजीनेच (Mumbai Indians) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर टाकला आहे. मुंबई इंडियन्सनी या हंगामात पहिला सामना गुजरात विरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गमावला. तर दुसऱ्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांची सनरायझर्स हैद्राबादकडून यथेच्छ धुलाई झाली. मुंबई विरुद्ध तब्बल २७७ धावा निघाल्या. या धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न मुंबई इंडियन्सनी केला. पण, तो कमी पडला. मुंबईचा संघ ५ बाद २४६ पर्यंत मजल मारू शकला. (Rohit Sharma in Mumbai)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : नाशिकच्या बदल्यात राष्ट्रवादीला राज्यसभेचा पर्याय ?)
या दोन्ही सामन्यात सलामीवीर रोहित शर्मची कामगिरी मात्र चांगली होती. त्याने अनुक्रमे २६ आणि ४६ धावा केल्या आहेत. मैदानातही तो हार्दिक पांड्याला व्यूहरचना आखताना मदत करताना दिसतोय. (Rohit Sharma in Mumbai)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community