मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून होणार रोहित शर्माचा सन्मान!

116

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांचे कर्णधारपद मिळाल्याबद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (एमसीए) रोहित शर्माला सन्मानित करण्यात येणार आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये रोहित शर्मा हा मुंबई संघाचा खेळाडू आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून त्याचा सत्कार करण्यात येणार आहे. एमसीएच्या सर्वोच्च समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल २०२२ सुरू होण्यापूर्वी सन्मान समारोहाचे आयोजन केले जाणार आहे.

 म्हणून करणार सन्मान

रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार बनला आहे. त्याने एकदिवसीय आणि टी-20 मध्ये संघाचे नेतृत्व केले आहे, परंतु आता त्याच्याकडे कसोटी संघाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित प्रथमच या फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व करणार आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपद मिळाल्याच्या आनंदात मुंबई क्रिकेट असोसिएशन लवकरच रोहित शर्माचा गौरव करणार आहे.

( हेही वाचा: एसटीच्या विलिनीकरणाचा विषय रखडलाच! काय घडले उच्च न्यायालयात? )

यांचाही केला जाणार सत्कार

रोहित व्यतिरिक्त भारतीय संघातील मुंबईकर खेळाडू सूर्यकुमार यादव आणि शार्दुल ठाकूर यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय टीमचा सलामीवीर अंगकृष रघुवंशी यालाही रोख एक लाख रुपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर, पृथ्वी शॉ आणि सरफराज खान यांचाही गौरव करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.