Rohit Sharma : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना; रोहित शर्मा संघाबरोबर नाही 

Rohit Sharma : रोहीत शर्मा पहिली कसोटी खेळण्याची शक्यता कमी आहे 

55
Rohit Sharma : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना; रोहित शर्मा संघाबरोबर नाही 
Rohit Sharma : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना; रोहित शर्मा संघाबरोबर नाही 
  • ऋजुता लुकतुके

बहुप्रतिक्षित बोर्डर – गावसकर चषकासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. पण, कर्णधार रोहित शर्मा सध्या संघाबोरबर नाही. पण, म्हणून तो पहिली कसोटी खेळणारच नाही असंही नाही. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘रोहित पहिल्या कसोटीत खेळणार नाही, असं समजू नका.’ रोहित आणि पत्नी रितिका सचदेव आपल्या दुसऱ्या अपत्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी रोहीतने ही सुटी घेतली आहे. (Rohit Sharma)

(हेही वाचा- Ind vs SA, 2nd T20 : १७ धावांत ५ बळी घेणारा वरुण चक्रवर्ती या विक्रमांचा शिलेदार)

‘हो. रोहित आज संघाबरोबर नाहीए. पण, म्हणून तो पहिली कसोटी खेळणारच नाही असं नाही. या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तो ऑस्ट्रेलियात पोहोचू शकतो. वेळेवर पोहोचला तर पहिली कसोटीही तो खेळेल,’ असं गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. भारतीय संघ दोन टप्प्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. यातील विराट कोहलीसह काही खेळाडू रविवारी ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत. तर उर्वरित खेळाडू सोमवारी निघणार आहेत. (Rohit Sharma)

भारतीय संघाला आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी निर्णायकपणे गाठण्यासाठी या मालिकेतील ४ सामने जिंकणं आवश्यक आहे. त्यामुळे ही मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाची बनली आहे. पण, बोर्डर – गावसकर चषकात भारतीय संघाची आतापर्यंतची कामगिरी चांगली आहे. अगदी ऑस्ट्रेलियातही भारताने दोन मालिका जिंकल्या आहेत. पण, तो फरक १-० आणि २-१ असा होता. पाच कसोटींची मालिका भारतीय संघाने निर्विवाद जिंकलेली नाही. (Rohit Sharma)

(हेही वाचा- ‘व्यापाऱ्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला’; Shiv Sena UBT चे संजय राऊत व्यापाऱ्यांवर का घसरले?)

२०१४ पासून बोर्डर – गावसकर चषक भारताकडेच आहे. त्यासाठी भारतातील ४ आणि ऑस्ट्रेलियातील २ मालिका भारतीय संघाने जिंकल्या आहेत. यंदा बोर्डर – गावसकर चषक मालिकेत ५ कसोटी सामने होणार असून पहिला सामना २२ नोव्हेंबरला पर्थ इथं होणार आहे. या सामन्यात रोहीत शर्मा खेळेल की नाही, याबद्दल कुतुहल आहे. त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह भारतीय संघाचा उपकर्णधार संघाचं नेतृत्व करेल. (Rohit Sharma)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.