रोहित शर्मा ठरला टी-20 मधला ‘हीट’ फलंदाज, रचला वर्ल्ड रेकॉर्ड

इंग्लंडला त्यांच्याच भूमीत पराभवाची धूळ चाखवल्यानंतर टीम इंडियाने आपला विजयी रथ कॅरेबियन बेटांमध्येही कायम ठेवला आहे. वेस्ट इंडिजला एकदिवसीय क्रिकेट मालिकेत व्हाईट वॉश दिल्यानंतर आता टी-20 मालिकेच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नवा रेकॉर्ड नोंदवला आहे.

रोहित शर्माचा नवा रेकॉर्ड

रोहित शर्मा टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा ठोकणारा जगातला टॉपचा फलंदाज ठरला आहे. दोन दिवसांपूर्वी न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलने केलेला रेकॉर्ड मोडत रोहितने ही कामगिरी केली आहे. पहिल्या टी-20 सामन्यात 33वी धाव घेत रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याची कमाई साधली आहे. 129 सामन्यांत शर्माने ही किमया साधली आहे. हा रेकॉर्ड करत रोहित शर्माने अर्धशतकही झळकावले. या सामन्यात रोहित शर्मा 64 धावांवर बाद झाला आहे.

गप्टीलला टाकले मागे

रोहित शर्माच्या खालोखाल न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिलने 116 सामन्यांत 3 हजार 399 धावा पटकावल्या आहेत. तर तिस-या क्रमांकावर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आहे. कोहलीने 99 सामन्यांत 3 हजार 308 धावा ठोकल्या आहेत. भारत सध्या वेस्ट इंडीज दौ-यावर असून वेस्ट इंडिजविरोधात पाच टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here