- ऋजुता लुकतुके
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) १४ महिन्यांनंतर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय टी-२० मालिका खेळत आहे. आणि अफगाणिस्तान विरुद्ध खेळताना रोहितने एक नवीन मापदंड सर केला आहे. मालिकेतील दुसरा सामना हा त्याचा १५० वा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना होता. अशी कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटपटू आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर आणखीही काही विक्रम आहेत. सर्वात जास्त १८२ षटकार या प्रकारात रोहितने लगावले आहेत. तर सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत ३,८५३ धावा केल्या आहेत. या यादीत त्याच्या वर आहे विराट कोहली. (Virat Kohli)
(हेही वाचा – Mahindra Bolero Neo Plus : जाणून घ्या महिंद्राच्या नवीन एसयुव्हीचे फिचर्स आणि किंमतही)
Milestone 🚨 – @ImRo45 is all set to play his 150th match in the shortest format of the game.
Go well, Skip 🫡#TeamIndia pic.twitter.com/1uWje5YNiq
— BCCI (@BCCI) January 14, 2024
रोहितसाठी या सामन्याचा अनुभव मात्र तितकासा चांगला नव्हता. भारतीय संघाने इंदूर इथं झालेला हा सामना ८ गडी राखून जिंकला. आणि मालिकेतही २-० अशी विजयी आघाडी घेतली. पण, खुद्द रोहित शर्मा (Rohit Sharma) सलामीला शून्यावर बाद झाला. लागोपाठच्या दोन सामन्यांत रोहितला भोपळाही फोडता आला नाही. आधीच्या सामन्यात शुभमन गिलच्या चुकीमुळे रोहित शून्यावर धावचीत झाला होता. पण, इंदूरमध्ये रोहित फारुकीच्या चेंडूवर चक्क त्रिफळाचीत झाला.
रोहितने आज ज्या विक्रमाला गवसणी घातली, त्या सर्वाधिक सामन्यांच्या यादीत रोहितच्या पाठोपाठ आहेत आयर्लंडचे दोन खेळाडू. पॉल स्टर्लिंग (१३४), जॉर्ज डॉकरेल (१२८). त्यानंतर पाकिस्तानच्या शोएब मलिकने १२४ सामने खेळले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community