भारतीय क्रिकेट संघ हा सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना झाला आहे. भारतीय संघाला २६ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळावी लागणार आहे. तर, एकदिवसीय वन-डे मालिका १९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. याची माहिती बीसीसीआयने ट्विटरवर फोटो शेअर करत दिली आहे. या आगामी मालिकेतून भारताचे दोन दिग्गज खेडाळू दुखापतीच्या कारणास्तव बाहेर पडले आहेत.
दुखापतीमुळे माघार
रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा या दोघांनाही दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये रोहित सराव करत असताना त्याच्या हाताला चेंडू लागला आणि दुखापत झाली. या दुखापतीतून सावरण्यासाठी रोहितला किमान ३-४ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून त्याला माघार घ्यावी लागली. तर, दुसरीकडे भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला असून त्याला पूर्णपणे ठीक होण्यासाठी मोठा कालावधी लागेल.
( हेही वाचा : भारताची अवकाश भरारी! अग्नी प्राइम क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी )
भारतीय संघातील वाद चव्हाट्यावर
भारतीय क्रिकेट संघातील वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. विशेषत: कोहलीच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यानंतर हा मुद्दा अधिकच तापला आहे. कोहलीला कर्णधारपदावरून हटवल्यामुळे सुरू झालेला वाद कोहलीच्या पत्रकार परिषदेनंतर आणखी वाढला. कोहलीने बुधवार 15 डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्याला कर्णधारपदावरून हटवण्याबाबत यापूर्वी माहिती देण्यात आली नव्हती. यासोबतच कोहलीने म्हटले होते की, बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दावा केल्याप्रमाणे टी-20 कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेताना त्याला कोणीही रोखले नव्हेत वा कोणत्याही प्रकारचा सल्ला देण्यात आला नव्हता. असेही स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community