Rohit Sharma Retirement Plan : रोहित शर्माच्या निवृत्तीचं ठरलं; ‘हा’ असणार शेवटचा सामना

Rohit Sharma Retirement Plan : आपण निवृत्तीचं अजून ठरवलं नसल्याचं रोहित म्हणतो.

89
Rohit Sharma Retirement Plan : रोहित शर्माच्या निवृत्तीचं ठरलं; 'हा' असणार शेवटचा सामना
  • ऋजुता लुकतुके

चॅम्पियन्स करंडक जिंकल्यानंतरच्या पत्रकार भारतीय कर्णधार परिषदेत रोहित शर्माने स्वत: विषय काढून सांगितलं की, ‘उगीच अफवा पसरवू नका. मी निवृत्त होत नाहीए.’ त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने थोडं विस्ताराने आपल्या निवृत्तीच्या योजनेबद्दल सांगितलं. ‘मी येणारा प्रत्येक दिवस नव्याने जगतोय. मी आताच कुठलाही निर्णय घेणार नाहीए. प्रत्येक नवीन आव्हानात स्वत:ला आजमावतोय. घाई गडबडीत कुठलाही निर्णय मला घ्यायचा नाही,’ असं रोहित तेव्हा म्हणाला. पण, आता समोर आलेल्या माहितीनुसार, रोहित शर्माने कधी निवृत्ती ध्यायची हे थोडंफार मनाशी ठरवलंय आणि २०२७ च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकापर्यंत खेळण्याची त्याची इच्छा आहे. ‘जर गोष्टी नियोजनाप्रमाणे घडल्या, तर त्याला २०२७ चा विश्वचषक खेळायचा आहे. ही विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिंबाब्वे आणि नामिबियात होणार आहे,’ असं क्रिकबझच्या बातमीत म्हटलं आहे. (Rohit Sharma Retirement Plan)

(हेही वाचा – Pakistan मध्ये ट्रेन अपहरणानंतर आता लष्करी तळावर आत्मघातकी हल्ला)

रोहित शर्मा आणखी दोन महिन्यांत ३८ वर्षांचा होणार आहे आणि २०२७ मध्ये तो ४० वर्षांचा असेल. या कालावधीत तो भारतीय संघाचा सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरबरोबर तंदुरुस्ती आणि फलंदाजीवर मेहनत घेणार आहे. नायर आणि रोहित मुंबई तसंच भारतीय संघातही एकत्र खेळले आहेत आणि भारतीय संघात अभिषेक नायरविषयी चांगलं मत आहे. के. एल. राहुल आणि दिनेश कार्तिक यांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसंच आयपीएलसाठीही त्याची मदत घेतली होती. (Rohit Sharma Retirement Plan)

(हेही वाचा – हिंदूंनी हलाल सर्टिफिकेशन असलेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा; भाजपा खासदार Anil Bonde यांचे आवाहन)

२०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत भारतीय संघ २७ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे आणि या सामन्यातील कामगिरीवरून रोहीतचं भवितव्य ठरेल. त्याचबरोबर आता आयपीएल सुरू होणार आहे. त्यातही रोहितच्या कामगिरीवर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांचंही लक्ष असेल. रोहितने टी-२० प्रकारातून निवृत्ती स्वीकारली असली तरी एकदिवसीय आणि कसोटी प्रकारात त्याला खेळण्याची इच्छा आहे. पण, आयपीएलमधील त्याच्या कामगिरीनंतरच इंग्लंड दौऱ्यासाठीची त्याची निवड आणि पुढची कारकीर्द यावर निर्णय होणार आहे. (Rohit Sharma Retirement Plan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.