ऋजुता लुकतुके
भारत आणि अफगाणिस्तान दरम्यानच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात (Rohit Sharma) भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मैदानावरील पंच विरेंदर शर्मा यांच्यातील एक विनोदी संभाषण स्टम्प माईकने टिपलं आहे. ते आता व्हायरलही होत आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये शून्यावर बाद झाल्यानंतर या सामन्यात रोहीतने फरीदच्या गोलंदाजीवर एक चेंडू ग्लान्स केला. तो चेंडू सीमारेषेच्या पार गेला. पण, पंच विरेंदर शर्मा यांनी त्या धावा लेगबाईजमध्ये धरल्या. म्हणजेच चेंडू रोहितच्या थायपॅडला लागून गेला, असं त्यांनी जाहीर केलं.
(हेही वाचा – Ind vs Afg 3rd T20 : दुसऱ्या सुपरओव्हरनंतर भारताचा ३ – ० ने विजय)
काय म्हणाला रोहित ?
या निर्णयामुळे रोहितला (Rohit Sharma) भोपळा फोडण्यास उशीर झाला. तो शून्यावरच राहिला. एकेरी धाव घेऊन तोपर्यंत रोहित पंचांच्याच दिशेनं धावत होता. आणि पंचांच्या जवळ आल्यावर तो गंमतीने उद्गारला, ‘वीरू, मी खेळलेला पहिलाच फटका तू थायपॅढ दिलास, होय. एवढी मोठी बॅटची कडा लागली होती. मी आधीच दोनवेळा भोपळाही न फोडता बाद झालो आहे!’ स्टम्प माईकने रोहीतचं हे बोलणं टिपलं. आणि मैदानात खेळाडूंमध्ये जोरदार हशा पिकला.
Rohit sharma is a character
Schooled umpire like a college freshman 🔥🔥🔥#RohitSharma #INDvAFG #INDvsAFG #CricketTwitter #T20WorldCup24— Secular Chad (@SachabhartiyaRW) January 17, 2024
पंचांनी दिली रोहितला मजेशीर दाद –
पंच विरेंदर सिंग यांनीही हसून रोहीतला (Rohit Sharma) दाद दिली. त्यानंतर मात्र रोहीतने फलंदाजीची सूत्रं आपल्या हातात घेत भारतीय डावाला आकार देण्याचं काम केलं. रिंकू सिंगबरोबर पाचव्या गड्यासाठी त्याने नाबाद १९० धावांची भागिदारी केली. आणि स्वत: आंतरराष्ट्रीय टी-२० मधील आपलं पाचवं शतक साकार केलं. ६९ चेंडूंत नाबाद १२१ धावा करताना त्याने ८ षटकार आणि ११ चौकार ठोकले.
(हेही वाचा – Iran-Pakistan Conflict : पाकिस्तानचा इराणवर प्रतिहल्ला; हवाई हल्ल्यात ७ दहशतवाद्यांचा मृत्यू)
१२१ ही त्याची वैयक्तिक (Rohit Sharma) सर्वोत्तम धावसंख्या आहे. तर टी-२० प्रकारात सर्वाधिक पाच आंतरराष्ट्रीय शतकं आता (Rohit Sharma) त्याच्या नावावर नोंदवली गेली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community