- ऋजुता लुकतुके
टी-२० विश्वचषक विजेता कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) पाठीवर दिग्गज खेळाडू सुनील गावसकरांनी (Sunil Gavaskar) कौतुकाची थाप दिली आहे. ‘कपिल आणि धोनीप्रमाणेच रोहित शर्मा (Rohit Sharma) हा लोकांच्या मनातील कर्णधार आहे,’ असं गावसकर यांनी म्हटलं आहे. २००७ चा टी-२० विश्वचषक आणि २०१३ चा चॅम्पियन्स करंडक हा रोहितने खेळाडू म्हणून जिंकला होता. त्यानंतर २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत रोहितने भारताला आपल्या नेतृत्वाखाली दुसऱ्या क्रमांकापर्यंत नेलं. अखेर ११ वर्षांनंतर आयसीसी विजेतेपदांचा दुष्काळही त्याने अलीकडे संपवला.
(हेही वाचा- मद्यवाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना Excise Department चा कर्मचारी ठार; Nashik मध्ये धक्कादायक प्रकार)
मागच्या महिन्यात भारतीय संघ रोहितच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकला आहे. रोहितचा संघ या स्पर्धेत शेवटपर्यंत अपराजित राहिला. या विजेतेपदानंतर कर्णधार म्हणून रोहित (Rohit Sharma) कपिल देव (Kapil Dev) आणि महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) या आयसीसी करंडक विजेत्या भारतीय कर्णधारांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
Two Icons! 🫡
Two T20 World Cup-Winning Captains 🏆 🏆
One PROUD Nation 🇮🇳
MS Dhoni 🤝 Rohit Sharma #T20WorldCup | #TeamIndia | #SAvIND | @msdhoni | @ImRo45 pic.twitter.com/oDdcYDm94G
— BCCI (@BCCI) June 29, 2024
त्यानंतर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही रोहितची (Rohit Sharma) कर्णधार म्हणून स्तुती केली आहे. ‘संघातील खेळाडूंचा तर तो लाडका आहेच. शिवाय भारतीयांचंही कर्णधार म्हणून त्याच्यावर प्रेम आहे. क्रिकेटच्या मैदानावर रणनीती आखण्यातही रोहित माहीर आहे. त्याच्या काही चाली कधी कधी बुचकाळ्यात पाडतात. पण, त्या अखेर यशस्वीही ठरतात,’ असं सुनील गावसकर सनडे – मिडडेशी बोलताना म्हणाले. (Rohit Sharma)
(हेही वाचा- BCCI Backs Rohit as Captain : ‘चॅम्पियन्स करंडक, कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी रोहितच कर्णधार,’ – जय शाह यांची स्पष्टोक्ती )
‘या विश्वचषकात रोहितने फलंदाजीतही आपला करिश्मा दाखवून दिला. त्याने मैदानात पुढे राहून संघाचं नेतृत्व केलं. मैदानाबाहेर राहुल द्रविडची साथ रोहितला होती. या दोघांनी मिळून संघाला विजयी केलं,’ असंही पुढे गावसकर यांनी म्हटलं आहे. रोहित हा लोकप्रिय कर्णधार आहे असं सांगताना त्यांनी राहुल द्रविडचंही कौतुक केलं. राहुलला भारतरत्न मिळावं अशी मागणी केली. (Rohit Sharma)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community