-
ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीनंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत तो पुन्हा एकदा भारतीय संघाचं नेतृत्व करतानाही दिसेल. भारतीय संघाने गेले दोन दिवस नागपूरमध्ये या मालिकेसाठी एकत्र सराव केला आहे. पण, रोहित पत्रकार परिषदेसाठी आला तेव्हा त्याला विचारण्यात आलेले प्रश्न त्याचा अलीकडचा फॉर्म आणि निवृत्तीवर होते. तिथे मात्र रोहित भडकला. (Rohit Sharma)
(हेही वाचा- Crime News : नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणारे 12 लाख रुपयाचे 3 इंजिन जप्त)
‘हा काय प्रश्न आहे? हा वेगळा फॉरमॅट आहे. वेळही वेगळी आहे. क्रिकेटपटूंना खेळातील चढ उतारांची चांगली जाण असते. मी त्याचा पुरेपूर अनुभव माझ्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत घेतला आहे. प्रत्येक दिवस इथं नवा असतो आणि प्रत्येक मालिका वेगळी असते,’ असं त्याने पत्रकाराला ठणकावून सांगितलं. निवृत्तीच्या प्रश्नाला तर त्याने थेटच बदल दिली. ‘हा प्रश्नच आता संयुक्तिक नाही. कारण, मी समोरच्या ३ एकदिवसीय सामन्यांचा विचार करतोय,’ इतकंच बोलून तो थांबला. (Rohit Sharma)
रोहितने गेल्यावर्षी जूनमध्ये टी-२० प्रकारातून आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर केली आहे. पण, कसोटी तसंच एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो भारतीय संघाचा कर्णधार आहे. आणि आगामी इंग्लंड विरुद्धची मालिका तसंच चॅम्पियन्स करंडकातही तोच संघाचं नेतृत्व करणार आहे. ‘मला माझ्या भवितव्याविषयीच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर इथं द्यावंसं वाटत नाही. मी सध्या फक्त आगामी ३ सामने आणि त्यानंतर होणारी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. पुढचं पुढे बघता येईल. माझ्या निवृत्तीविषयीच्या चर्चा मी गेले काही वर्षं ऐकतोय. पण, माझ्या डोक्यात सध्या क्रिकेट आहे,’ असं रोहित म्हणाला. (Rohit Sharma)
(हेही वाचा- युद्धग्रस्त गाझा पट्टीचा ताबा अमेरिका घेईल; Donald Trump यांची घोषणा)
भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील तीन सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद इथं ६, ९ आणि १२ फेब्रुवारीला होणार आहेत. त्यानंतर भारतीय संघ चॅम्पियन्स करंडकासाठी दुबईला रवाना होईल. तिथे २० फेब्रुवारीला भारताचा पहिला सामना बांगलादेशशी होणार आहे. रोहित शर्मा अलीकडे खराब फॉर्मशी झगडतोय. ऑस्ट्रेलियात तर त्याने ३ कसोटींत ६.२० धावांच्या सरासरीने ३१ धावा केल्या होत्या. या मालिकेनंतर रोहितच्या निवृत्तीची जोरदार चर्चा सुरू आहे. (Rohit Sharma)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community