-
ऋजुता लुकतुके
बोर्डर – गावसकर मालिकेत खराब कामगिरीमुळे टीकेचा धनी झालेला कर्णधार रोहित शर्मा मुंबई रणजी संघाबरोबर सरावात सहभागी झाला आहे. मुंबईचा संघ येत्या २३ जानेवारीला जम्मू काश्मीरबरोबर सामना खेळणार आहे. पण, हा सामना रोहित खेळणार की नाही हे अजून नक्की नाही. या लढतीसाठी मुंबईची अंतिम संघ निवड होईल, तेव्हा रोहितशी याविषयी संपर्क साधला जाईल, असं मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून सांगण्यात येत आहे. (Rohit Sharma)
(हेही वाचा- तीन प्रमुख Warships राष्ट्राला समर्पित; पंतप्रधानांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण)
रोहितने नेट्समध्ये अजिंक्य रहाणेबरोबर रोहितने फलंदाजीचा सराव केला. तो इथून पुढेही या सराव सत्रांमध्ये सहभागी होणार आहे. ३७ वर्षीय रोहित बोर्डर – गावसकर मालिकेत ३ कसोटी खेळला. आणि यात त्याने फक्त ३१ धावा केल्या. त्याची सरासरी ६.२० इतकी कमी होती. संघातील त्याची फलंदाजीची क्रमवारीही वादात सापडली. त्यामुळे अखेर पाचव्या सिडनी कसोटीत रोहितने स्वत:लाच वगळण्याचा निर्णय घेतला. (Rohit Sharma)
Indian cricket captain Rohit Sharma after training at the Mumbai nets at the Wankhede Stadium 🏟 today:) pic.twitter.com/q2H6xclg1i
— Gaurav Gupta (@toi_gauravG) January 14, 2025
रोहितच्या खराब कामगिरीमुळे भारतीय संघातील त्याच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. तो कसोटी क्रिकेट कधीपर्यंत खेळू शकेल, हा दुसरा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत रविवारी भारतीय संघ प्रशासन आणि बीसीसीआयचे पदाधिकारी तसंच निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांची एक बैठक रविवारी मुंबईत झाली. या बैठकीला रोहित हजर होता. या बैठकीत ऑस्ट्रेलियातील कामगिरीचा आढावा घेण्यात आला. (Rohit Sharma)
(हेही वाचा- vishrambaug wada : विश्रामबाग वाड्यात कोण राहत होतं आणि आता या वाड्यात काय होतं?)
या बैठकीतही खेळाडूंनी रणजी सामने खेळण्याचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे. मुंबईसाठी आगामी जम्मू संघाविरुद्धचा सामना बाद फेरी गाठण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पण, रोहित हा सामना खेळणार का हे अजून स्पष्ट नाही. रोहितत २०१५-१६ च्या हंगामात उत्तर प्रदेशविरुद्ध आपला शेवटचा रणजी सामना खेळला होता. रोहित नाही पण, यशस्वी जयसवाल मुंबईकडून जम्मू व काश्मीरविरुद्ध खेळणार असल्याचं समजतंय. (Rohit Sharma)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community