-
ऋजुता लुकतुके
३६ व्या वर्षी रोहित शर्माने (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी मजल मारली आहे. पण, सुरुवातीपासून रोहितवर कसला आरोप होत असेल तर तो तंदुरुस्ती न राखल्याचा. त्याच्याबरोबरच कारकीर्दीची सुरुवात करूनही विराट कोहली (Virat Kohli) जागतिक स्तरावर इतका पुढे गेला. पण, हळू हळू रोहितने त्याला गाठलं. भारतीय संघाचं नेतृत्व करण्यापर्यंत मजल मारली. आता चर्चा आहे ती रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी निवृत्त होणार? याविषयी उत्तर देताना त्याने आपल्या टीकाकारांना पुन्हा एकदा गप्प बसवलं आहे.
(हेही वाचा- Nagpur Hit And Run Case : भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल )
‘मी गेली १७ वर्षं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय. माझा ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना समोर आहे. मला नाही वाटत, फारशा कुणी अशी कामगिरी केलीय,’ असं त्याने जितेंद्र चोकसी च्या पॉडकास्ट कार्यक्रमात बोलताना सांगितलं. (Rohit Sharma)
Interviewer : What do you think about fitness in cricket?
Rohit Sharma : ” I’ve played cricket for 17-18 years and 500 intl games; not many have done that. There’s something to the longevity and routine I follow.”
Bro on a mission 😭🔥 pic.twitter.com/x9q24QAI6L
— Jod Insane (@jod_insane) September 28, 2024
रोहित शर्मा (Rohit Sharma) खरंच ५०० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या उंबरठ्यावर उभा आहे. जागतिक स्तरावर अशी कामगिरी करणारा तो फक्त अकरावा खेळाडू असेल. भारताकडून या यादीत आहेत सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), महेंद्र सिंग धोनी (MS Dhoni), विराट कोहली (Virat Kohli) आणि आता रोहित शर्माने ही मजल मारली आहे. आपल्या या मोठ्या कारकीर्दीचं श्रेय रोहितने शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीला दिलं आहे. ‘शारीरिक तंदुरुस्ती, मनाची उभारी कायम ठेवणं, सामन्यासाठी योग्य तयारी करणं, यामुळे मला इथपर्यंत मजल मारणं शक्य झालं आहे. तुम्ही सामन्याची तयारी कशी करता यावर सगळं अवलंबून आहे,’ असं रोहित म्हणाला. (Rohit Sharma)
(हेही वाचा- IPL Retention : कोणते खेळाडू कायम ठेवणार ते ठरवण्यासाठी आयपीएल फ्रँचाईजींकडे आहेत ‘इतके’ दिवस)
२००७ साली रोहितने आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. २६२ एकदिवसीय सामन्यांत रोहितने ४९ धावांच्या सरासरीने १०,७०९ धावा केल्या आहेत. तर ५९ कसोटींत ४५ च्या सरासरीने ४,१३७ धावा त्याच्या नावावर आहेत. याशिवाय तो १६९ टी-२० सामने खेळला आहे. यातही त्याने ४,००० च्या वर धावा केल्या आहेत. (Rohit Sharma)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community