Rohit Sharma : रोहित शर्माने सुरू केला न्यूझीलंड मालिकेसाठी सराव

Rohit Sharma : १६ ऑक्टोबरपासून बंगळुरू इथं न्यूझीलंड विरुद्ध पहिली कसोटी सुरू होत आहे.

104
Rohit Sharma : रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात दाखल, पर्थमध्ये केला नेट्समध्ये सराव
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघासाठी देशांतर्गत कसोटी हंगाम आता सुरू झाला आहे. पुढील पाडाव आहे तो न्यूझीलंड विरुद्धची तीन कसोटींची मालिका. त्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आता सज्ज होत आहे. रोहित, विराट आणि रवींद्र जाडेजा यांनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या टी-२० मालिकेत तिघंही खेळत नाही आहेत. पण, या वेळेत रोहीत तसंच विराटही कसोटीचा सराव करताना दिसत आहेत.

१६ ऑक्टोबरपासून न्यूझीलंड विरुद्धची पहिली कसोटी बंगळुरू इथं सुरू होत आहे. त्यापूर्वी रोहित शर्माचा (Rohit Sharma) सराव करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रोहित या व्हिडिओत धावण्याचा सराव करत आहे आणि मैदानावर काही चाहत्यांनीही गर्दी केलेली दिसतेय.

(हेही वाचा – Joe Root : साहेबांच्या देशाला सुनील गावसकरांचा विक्रम मोडायला लागली इतकी वर्षं)

रोहितचा खेळ भारतीय खेळपट्ट्यांवर जास्त खुलतो. आतापर्यंत न्यूझीलंड विरुद्ध रोहित ६ कसोटी सामने खेळला आहे. आणि यात त्याने ५३ धावांच्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे ८२. रोहित मुंबईत सराव करतोय आणि त्याचा सराव पाहण्यासाठी चाहते गर्दीही करत आहेत. रोहितने (Rohit Sharma) सरावानंतर चाहत्यांना फोटो काढण्याची संधीही दिली. तसा फोटोही व्हायरल होत आहे.

(हेही वाचा – Ratan Tata Death : रतन टाटांच्या अंत्यविधी आणि अंत्ययात्रेच्या नियोजनासाठी बीएमसी, टाटा ट्रस्ट यांच्याकडून ‘असं’ आहे नियोजन)

न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत ३ कसोटी सामने होणार आहेत. पहिली कसोटी बंगळुरू इथं तर दुसरी कसोटी २४ ऑक्टोबरपासून पुण्यात आणि तिसरी कसोटी १ नोव्हेंबरपासून मुंबईत होणार आहे. भारतातील ही मालिका संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना होईल. तिथे बॉर्डर-गावस्कर चषकाअंतर्गत पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन दुखापतीमुळे या मालिकेत खेळणार नाहीए. (Rohit Sharma)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.