Rohit Sharma : रोहित शर्मा भोवती मुंबई विमानतळावर चाहत्यांचा गराडा, फोटोसाठी घातली गळ 

Rohit Sharma : अमेरिकेत सुटी घालवून परतलेला रोहित शर्मा आता लवकरच एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंकेला रवाना होणार आहे

185
Rohit Sharma : रोहित शर्मा भोवती मुंबई विमानतळावर चाहत्यांचा गराडा, फोटोसाठी घातली गळ 
Rohit Sharma : रोहित शर्मा भोवती मुंबई विमानतळावर चाहत्यांचा गराडा, फोटोसाठी घातली गळ 
  • ऋजुता लुकतुके

टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने विजेतेपद पटकावलं. त्यानंतर देशातील विजयी मिरवणूक तसंच पंतप्रधानांची भेट आणि मुंबई विधानभवनात झालेल्या सत्कारानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) क्रिकेटमधून काही दिवस सुट्टी घेतली होती. या काळात तो आपली पत्नी रितिका आणि मुलगी समायराबरोबर अमेरिकेत होता. गुरुवारी संध्याकाळी तो अमेरिकेतून मुंबईत परतला. रोहितला पाहताच विमानतळावर त्याच्याभोवती मोठी गर्दी जमली. सगळ्यांना रोहितबरोबर फोटो काढण्याची इच्छा होती.

(हेही वाचा- CM Eknath Shinde : नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर येथे कांदा महाबॅंक सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश)

‘रोहित सर, एक फोटो दे दो ना,’ अशी विनंती त्याला होत होती. भारतीय संघाच्या विजयानंतर रोहितच्या नेतृत्वावर चाहत्यांनी दाखवलेला विश्वास या गर्दीतून दिसत होता. मधल्या काळात तो अमेरिकेत सुट्टीवर गेला होता. त्यानंतर विम्बल्डनच्या सामन्यांनाही त्याने हजेरी लावली.

 टी-२० विश्वचषकातील (T20 World Cup) विजयानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. आता रोहितचं लक्ष श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेकडे आणि त्यानंतर चॅम्पियन्स करंडकाकडे असेल. तर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमध्येही तोच भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे.

(हेही वाचा- Kanwar Yatra Controversy: नेमप्लेटच्या वादावर योगी सरकारने SC मध्ये दाखल केले उत्तर, जाणून घ्या काय आहेत युक्तिवाद?)

अलीकडेच नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने रोहित २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचं नेतृत्व करू शकतो, असं म्हटलं होतं. तर ३६ वर्षीय रोहितने (Rohit Sharma) कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपर्यंत नक्कीच खेळत राहणार असल्याची ग्वाही दिली आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.