Rohit Sharma : बांगलादेश मालिकेपूर्वी रोहित शर्माचा फलंदाजीचा जोरदार सराव

98
Rohit Sharma : बांगलादेश मालिकेपूर्वी रोहित शर्माचा फलंदाजीचा जोरदार सराव
Rohit Sharma : बांगलादेश मालिकेपूर्वी रोहित शर्माचा फलंदाजीचा जोरदार सराव
  • ऋजुता लुकतुके

भारतात क्रिकेटचा हंगाम सुरू होत आहे. आणि भारतीय संघासाठी तर आगामी कार्यक्रम अत्यंत व्यस्त असणार आहे. सुरुवातीला सप्टेंबर महिन्यात बांगलादेश विरुद्धची मालिका. आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियात रवाना होईल. यात खेळाडूंसाठी तयारीचा वेळ खूपच कमी आहे. आगामी सप्टेंबर ते जानेवारी या काळात भारतीय संघ तब्बल १० कसोटी सामने खेळणार आहे. रोहित आणि विराट या अनुभवी खेळाडूंनी दुलिप करंडकातून माघार घेतली असली तरी त्यांचा सराव सध्या सुरू आहे.

सप्टेंबर महिन्यात बांगलादेशचा संघ भारताचा दौरा करणार आहे. आणि यात २ कसोटी सामने आहेत. त्यानंतर न्यूझीलंडबरोबर ३ कसोटींची मालिका भारतीय संघाला मायदेशातच खेळायची आहे. आणि त्यानंतर आहे बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलियाचा दौरा. बोर्डर – गावसकर चषकात ५ कसोटी भारताला खेळायच्या आहेत. या आव्हानासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) तयार होत आहे. मुंबईतच भारतीय संघाचा फलंदाजीचा प्रशिक्षक अभिषेक नायरच्या देखरेखीखाली रोहित (Rohit Sharma) सराव करत आहे. दोघांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर झळकले आहेत. आणि यातील एका फोटोत अभिषेक आणि रोहितसह मुंबईकर गोलंदाज धवल कुलकर्णीही दिसत आहे.

(हेही वाचा – लाडकी बहीण योजना आणून आम्ही चूक केली का? उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा सवाल)

(हेही वाचा – Vidhan Sabha Election 2024 : महायुती आणि महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात तिसरी आघाडी स्थापन होणार? )

१९ सप्टेंबरपासून भारताची बांगलादेश विरुद्धची मालिका सुरू होत आहे. त्यापूर्वी ५ सप्टेंबरला देशांतर्गत क्रिकेट हंगाम दुलिप करंडकाने सुरू होईल. रोहित, विराट आणि जसप्रीत या प्रमुख खेळाडूंव्यतिरिक्त इतर खेळाडू दुलिप करंडक खेळणार आहेत. तर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि खलिल अहमद हे तेज गोलंदाज तब्येत बिघडल्यामुळे खेळू शकणार नाहीत. मुंबईकर फलंदाज आणि टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला बूचीबाबू करंडक स्पर्धा खेळताना बोटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो आगामी काळात लगेच खेळू शकेल का यावर प्रश्नचिन्ह आहे.

विराट कोहली अजूनही आपल्या कुटुंबीयांसमवेत लंडनमध्येच आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.