-
ऋजुता लुकतुके
भारतीय कर्णधार रोहित शर्माने २०२४ सालाला निरोप देताना एक भावनिक व्हीडिओ पोस्ट केला आहे. या वर्षातील सगळ्या चांगल्या व दु:खद प्रसंगांना समर्पित असा हा व्हीडिओ आहे. ‘वर्षातील सगळे उच्चांकाचे आणि नीच्चांकाचे क्षण आणि त्यामध्ये आलेले सगळे क्षण या सगळ्यांसाठी फक्त मनात कृतज्जता आहे,’ असं रोहितने संदेशात लिहिलं आहे. या १२ महिन्यातील आव्हानं, विजय आणि क्रिकेट तसंच वैयक्तिक आयुष्यातील प्रसंग यांचा उल्लेख रोहितने या व्हीडिओत केला आहे. (Rohit Sharma)
(हेही वाचा- Ministry Entrance Pass : आता घरबसल्या मंत्रालयातील प्रवेशाचा पास ॲपवरून काढता येणार)
भारतीय संघाने जूनमध्ये टी-२० विश्वचषक जिंकला त्या क्षणानेच या व्हीडिओची सुरुवात होते. रोहित या संघाचा कर्णधार होता. आणि ११ वर्षांनंतर भारताने एखादा आयसीसी करंडक जिंकला होता. त्यामुळे महेंद्रसिंग धोनीनंतर हा चषक जिंकणारा रोहित फक्त दुसरा भारतीय कर्णधार बनला. तर इंग्लंड आणि वेस्ट इंडिजनंतर दोनदा हा चषक जिंकणारा संघ होण्याचा मान भारताने मिळवला. (Rohit Sharma)
View this post on Instagram
रोहित या स्पर्धेत २५७ धावांसह भारताचा सगळ्यात यशस्वी फलंदाज ठरला. तर अर्शदीपने १७ बळी मिळवत तो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. जसप्रीत बुमराहने टी-२० मध्ये अचूक गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवत ही स्पर्धा गाजवली. त्यालाच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. स्पर्धेनंतर रोहित, विराट आणि जडेजा यांनी टी-२० मधून निवृत्ती पत्करली. (Rohit Sharma)
(हेही वाचा- मणीपूरमध्ये संपूर्ण वर्ष अत्यंत दुर्दैवी गेले; CM Biren Singh यांनी मागितली क्षमा)
टी-२० मध्ये चांगली कामगिरी होत असताना एकदिवसीय आणि कसोटींत रोहितसाठी हे वर्षं कमालीचं अपयशी ठरलं आहे. भारताने यावर्षी एकही एकदिवसीय मालिका जिंकली नाही. तर कसोटींत इंग्लंडविरुद्ध ४-१ असा मिळवलेला मालिका विजय सोडला, तर न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावर झालेला ०-३ असा पराभव आणि अलीकडे ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेत १-२ अशी पिछाडी या निकालांमध्ये रोहीतच्या कप्तानीवरही टीका होतेय. (Rohit Sharma)
फलंदाज म्हणून त्याची यावर्षीची सरासरी आहे जेमतेम २३ धावांची. आणि सध्या सुरू असलेल्या बोर्डर – गावसकर मालिकेत त्याने ६.२० धावांच्या सरासरीने आतापर्यंत ३१ धावा केल्या आहेत. (Rohit Sharma)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community