-
ऋजुता लुकतुके
बोर्डर गावसकर चषकापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. रोहित दुसऱ्यांदा बाप झाला असून पत्नी रितिकाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. रोहित आता लगेचच ऑस्ट्रेलियात जाणार का अशी चर्चाही बरोबरीने रंगली आहे. (Rohit Sharma)
(हेही वाचा- Mumbai Local Train: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! शनिवार – रविवार 12 तासांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा)
Rohit Sharma and Ritika have been blessed with a baby boy. 👦
– Many congratulations to them! 🥺❤️ pic.twitter.com/2zergbSj2u
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2024
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि रितिका सजदेह दुसऱ्यांदा बाबा झाले. रोहित आणि रितिका यांना आधी एक मुलगी आहे. तिचे नाव समायरा आहे. रोहित आणि रितिका यांनी २०१५ मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या ३ वर्षानंतर म्हणजेच २०१८ मध्ये रोहित आणि रितिका पहिल्यांदाच आई-वडील झाले आणि समायरा यांचा जन्म झाला. आता लग्नासाठी ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दोघेही दुसऱ्यांदा आई-वडील झाले असून रितिकाने मुलाला जन्म दिला आहे. या दोघांनीही आपल्या मुलाचे नाव काय ठेवले आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Rohit Sharma)
Congratulations Ritika and Rohit Sharma as they have been blessed with a baby boy!
The Captain hopefully should be on the flight to Perth in a few days, touch-and-go for the first Test there— Vikrant Gupta (@vikrantgupta73) November 15, 2024
रोहित शर्मा सध्या आपल्या पत्नीबरोबर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्घची पहिली कसोटी तो खेळणार की नाही याबद्दल अनिश्चितता आहे. उर्वरित भारतीय संघाबरोबर तो ऑस्ट्रेलियाला गेला नव्हता. पण, आता तो कुटुंबीयांबरोबर २ दिवस राहून ऑस्ट्रेलियाला जाण्याचा निर्णय घेऊ शकतो. (Rohit Sharma)
बोर्डर गावसकर चषकाचं वेळापत्रक
पहिली कसोटी: २२ ते २६ नोव्हेंबर
दुसरी कसोटी : ६ ते १० डिसेंबर
तिसरी कसोटी: १४ ते १८ डिसेंबर
चौथी कसोटी : २६ ते ३० डिसेंबर
पाचवी कसोटी : ३ ते ७ जानेवारी