- ऋजुता लुकतुके
रोहित शर्माने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतर पहिल्यांदा आपलं मन मोकळं केलं आहे. (Rohit Sharma on World Cup Defeat)
नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाचा अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून अनपेक्षित पराभव झाला. या पराभवानंतर पहिल्यांदाच भारतीय कर्णधार रोहित शर्माने स्पर्धेदरम्यानचे उतार चढावाचे क्षण, आव्हानात्मक प्रसंग आणि अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतर दाटून आलेल्या भावना यावर उघड भाष्य केलं आहे. (Rohit Sharma on World Cup Defeat)
खेळाडू आणि फॅन्सचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख
आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रोहितने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. स्पर्धेदरम्यान खेळाडू आणि फॅन्सदरम्यान तयार झालेल्या भावनिक नात्याचा त्याने कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे. ‘अंतिम सामना हरल्यानंतर मला सगळ्यांपासून दूर जावंसं वाटत होतं. पराभव विसरणं शक्य होत नव्हतं. म्हणूनच मी थोडा अलिप्त राहात होतो. पण, जिथे जिथे गेलो, लोक स्वत:हून माझ्याशी बोलायचे आणि आम्ही कसे चांगले खेळलो हेच मला सांगायचे. त्यांनीही आमच्याबरोबरच विश्वचषक उंचावण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मला त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटते,’ अशी सुरुवात रोहितने या व्हिडिओत केली आहे. (Rohit Sharma on World Cup Defeat)
View this post on Instagram
(हेही वाचा – Tennis Hall of Fame : लिअँडर पेस आणि विजय अमृतराज यांचा मानाच्या टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश)
‘प्रेक्षक स्पर्धेचा दीड महिना तन-मनाने आमच्याबरोबर राहिले. आम्ही जिथे गेलो आम्हाला त्यांचा पाठिंबा मिळाला. त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम वाटतं. पण, पुन्हा दुसरी भावनाही उचल खाते. आम्ही त्यांच्यासाठी विश्वचषक जिंकू शकलो नाही,’ अशी भावना पराभवानंतर जवळ जवळ एका महिन्यानंतर रोहितने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर चाहत्यांच्या कौतुकामुळेच दु:ख थोडं हलकं झालं असं म्हणालयालाही तो विसरला नाही. (Rohit Sharma on World Cup Defeat)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community