- ऋजुता लुकतुके
भारतीय संघाचा न्यूझीलंड विरुद्ध धरच्या मैदानावरच दारुण पराभव झाला. एकतर पहिल्यांदाच भारताला मायदेशात व्हाईटवॉश पत्करावा लागला. दुसरं म्हणजे सलग १८ मालिकांनंतर भारतात संघाचा पहिल्यांदाच पराभव झाला. न्यूझीलंडने भारतात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली. ०-३ ने मायदेशात पराभव पत्करण्याची ही भारताची पहिलीच वेळ होती. हे कमी म्हणून की काय कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर एक नकोसा विक्रम लागला आहे.
या कसोटी हंगामात भारताचा हा चौथा मायदेशात झालेला पराभव ठरलाय. यापूर्वी इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत भारताने पहिला कसोटी सामना गमावला होता. त्यानंतर न्यूझीलंडने सलग तीन कसोटी जिंकल्या आहेत. भारताचे चारही पराभव रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली झाले आहेत. आणि त्यामुळे त्याच्या नावावर एक नकोसा विक्रम जमा झाला आहे. मन्सूरअली खान पतौडी यांच्यानंतर एका वर्षात ४ कसोटी पराभव होणारा रोहित हा फक्त दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे.
(हेही वाचा – Ind vs SA, T20 Series : भारतीय टी-२० संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचला तो क्षण…)
१९६९ मध्ये मन्सूर अली खान पतौडी यांच्या संघाने न्यूझीलंड विरुद्ध एक आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन कसोटी गमावल्या होत्या. त्यानंतर रोहितच्या (Rohit Sharma) संघाने तशी कामगिरी केली आहे. जानेवारी महिन्यात भारताने इंग्लंड विरुद्ध हैद्राबादमधील कसोटी गमावली होती. त्यानंतर आता न्यूझीलंडने संघाला व्हाईटवॉश दिला आहे. या दोन पराभवांमध्ये झालेल्या सलग सहा कसोटी मात्र भारतीय संघाने जिंकल्या आहेत. न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही कमजोर ठरली.
पहिल्या बंगळुरू कसोटीत भारतीय संघाला न्यूझीलंडने ८ गडी राखून हरवलं. तर दुसरी पुणे कसोटी भारताने ११३ धावांनी गमावली. तिसऱ्या मुंबई कसोटीतही भारताला २५ धावांनी पराभव पत्करावा लागला. हे तीनही कसोटी सामने भारताने ३ दिवसांच्या आत गमावले. एकूण कारकीर्दीचा विचार केला तर रोहितच्या (Rohit Sharma) कप्तानीखाली भारताने मायदेशात ५ कसोटी सामने गमावले आहेत. या बाबतीतही तो मन्सूर अली खान पतौडींच्या मागे आहे. पतौडी यांच्या कारकीर्दीत भारताने ९ कसोटी गमावल्या होत्या. तर विराट कोहलीच्या कप्तानीत भारताने परदेशात विजय मिळवले. आणि भारतात फक्त ३ कसोटी गमावल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community