-
ऋजुता लुकतुके
भारतीय संघ दुसऱ्या ॲडलेड कसोटीपूर्वी काही दिवस कॅनबेरामध्ये असणार आहे. ऑस्ट्रेलियन राजधानीत असताना भारतीय संघाने गुरुवारी ऑस्ट्रेलियन संसदेलाही भेट दिली. त्याचबरोबर पंतप्रधान अँथनी एबिनीज यांचीही भेट घेतली. कर्णधार रोहित शर्माला संसदेत सभागृहासमोर भाषण करण्याची संधी मिळाली. ती साधून रोहितने पर्थमधील विजयाचं भारतासाठी असलेलं मोल उपस्थितांना सांगितलं. या विजयावर स्वार होऊन दौऱ्यात आणखी यश मिळवायला भारतीय संघ सज्ज असल्याचंही रोहीतने सांगितलं. (Rohit Sharma)
(हेही वाचा- पुरातत्व व संग्रहालये विभागाकडून Tuljabhavani Temple आणि परिसराला मिळणार गतवैभव)
पहिल्या पर्थ कसोटीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा २९५ धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयावर बोलतानाच रोहित शर्माने भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची क्रिकेटमुळे वाढलेली मैत्रीही अधोरेखित केली. ‘भारत आणि ऑस्ट्रेलियाची मैत्री खूप जुनी आहे. क्रिकेट, व्यापार दोन्हीतही ही मैत्री टिकून आहे. या देशात दौरा करणं, इथे क्रिकेट खेळणं भारतीय संघासाठी खूपच आनंददायी गोष्ट आहे. इथल्या लोकांनाही क्रिकेट आवडतं. खेळाडूंमध्ये स्पर्धा करण्याची ईर्ष्या आहे. त्यामुळे ही मालिका नेहमीच रंगतदार होते. त्यामुळे इथे येऊन क्रिकेट खेळणं हे आमच्यासाठीही आनंद देणारं आहे, असं रोहित शर्मा म्हणाला. (Rohit Sharma)
Full speech of Captain Rohit Sharma at Parliament house Canberra Australia.🙌🇮🇳🔥
THE AURA THE SWAG @ImRo45 🐐🙇🏼♂️ pic.twitter.com/YbeLk2idBs
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) November 28, 2024
‘या आधीच्या दौऱ्यात आणि गेल्या आठवड्यात भारताला मिळालेलं यश आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. सुरुवातीच्या या यशाचं रुपांतर मोठ्या यशात करण्याचा आमचा मानस आहे. आम्हाला इथलं क्रिकेट आवडतं. आम्हाला इथली संस्कृतीही आवडते. इथे वेगवेगळ्या शहरांना भेट देणं आम्हाला सगळ्यात आवडतं,’ असं रोहित पुढे म्हणाला. ऑस्ट्रेलियन चाहत्यांचं मनोरंजन केल्याचं समाधानही आम्हाला आहे. ते आम्ही पुढेही करणार आहोत, असं रोहित शर्मा म्हणाला. (Rohit Sharma)
(हेही वाचा- Crime News: मृत्यूनंतर 11 दिवस मुलाला ठेवले व्हेंटिलेटरवर, 6 डॉक्टरांवर गुन्हा दाखल)
भारतीय संघ शनिवारी आणि रविवारी कॅनबेरा इथं सराव सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धची दुसरी कसोटी ६ डिसेंबरपासून ॲडलेड इथं सुरू होणार आहे. (Rohit Sharma)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community