-
ऋजुता लुकतुके
भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस मैदानातील खेळपट्टीवर तिरंगा रोवला, तो क्षण भारताच्या ऐतिहासिक टी-२० विजयाचा एक मानबिंदू ठरला आहे. लोकांच्या मनात त्या स्मृती कायम जाग्या राहणार आहेत. तेव्हाच्या प्रसंगाचं महत्त्व लक्षात घेऊन त्या स्मृती दीर्घ काळ जागवण्यासाठीच रोहित शर्माने (Rohit Sharma) आपल्या सोशल मीडिया हँडलवर तो फोटो प्रोफाईल चित्र म्हणून टाकला आहे. अख्ख्या देशाला तेव्हा झालेला आनंद आणि अभिमान यांचं प्रतीक म्हणून हा फोटो भारतीयांना लक्षात राहील.
या विजयानंतर रोहितने टी-२० क्रिकेटमधून आपली निवृत्तीही जाहीर केली. त्यामुळे या प्रसंगाचं महत्त्व आणि रोहितचं भारतीय संघातील स्थान या फोटोने अधिकच अधोरेखित केलं आहे.
(हेही वाचा – BEST Bus : भंगार विक्रीत गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी)
#NewProfilePic pic.twitter.com/aDJFxW8783
— Rohit Sharma (@ImRo45) July 8, 2024
३७ वर्षीय रोहित शर्मा (Rohit Sharma) हा आयसीसी करंडक भारताला जिंकून देणारा तिसरा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी कपिल देव (Kapil Dev) आणि महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) यांनी ही किमया केली होती. रोहितच्या कप्तानीखाली मागच्या वर्षभरात भारतीय संघ एकदिवसीय विश्वचषक तसंच टी-२० विश्वचषक अशा दोन्ही स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचला. एकदिवसीय क्रिकेटमध्येही सलग दहा सामने अपराजित राहण्याचा मान भारताने मिळवला आहे. तर आताही टी-२० विश्वचषकात अपराजित राहत स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रोहितच एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार राहणार हे रविवारीच स्पष्ट केलं आहे. निदान चॅम्पियन्स करंडक आणि पुढील वर्षी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत तो खेळणार आहे. आणि कर्णधारपदी कायम असणार आहे.
हेही पहा –
https://www.youtube.com/watch?v=xyJZALwkGSE
Join Our WhatsApp Community