-
ऋजुता लुकतुके
मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळताना आपली भूमिका आणि जबाबदारी वेळोवेळी बदलत गेली आहे असं रोहित शर्माने (Rohit Sharma) अलीकडे बोलून दाखवलं आहे. मुंबईकडून तो आधी मधल्या फळीत खेळायला लागला, त्यानंतर संघाचा कर्णधार झाला. आणि त्यानंतर तो नेतृत्वाबरोबरच सलामीला येऊन गोलंदाजांवर हल्ला चढवण्याची भूमिका निभावत आहे. ‘भूमिका आणि जबाबदारी वेळोवेळी बदलली असली. तरी खेळाविषयीचं प्रेम कमी झालेलं नाही. खेळणं आणि फ्रँचाईजीला चषक जिंकून देण्याची मनिषा कमी झालेली नाही,’ असं रोहितने (Rohit Sharma) सांगितलं. खरंतर सध्या रोहित खराब फॉर्मशी झगडत आहे. २०२० नंतरची आयपीएलमधील त्याची ही सगळ्यात खराब सुरुवात आहे. पहिल्या तीन सामन्यांत त्याने अनुक्रमे ०, ८ आणि १३ धावा केल्या आहेत. कोलकाता विरुद्ध संघ प्रशासनाने त्याला इम्पॅक्ट खेळाडू (Impact player) म्हणून वापरलं. संघाची गोलंदाजी सुरू असताना तो संघात नव्हता. पण, १६ व्या षटकांत इम्पॅक खेळाडू (Impact player) म्हणून त्याला मैदानात उतरवण्यात आलं.
‘मी खेळायला सुरुवात केली तेव्हापासून बरंच काही बदललं आहे. आधी मी संघाचा कर्णधार होतो. आता नाहीए. आम्ही मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) करंडक जिंकले तेव्हाचे काही खेळाडू आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत. बदल अनिवार्य आहेत. आणि ते होतातच. फक्त खेळाचा दृष्टीकोण बदलत नाही. खेळण्याची आणि जिंकण्याची इच्छा कधीच बदलत नाही,’ असं रोहित म्हणाला. रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएलच्या इतिहासातील सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) त्याने तब्बल ५ करंडक जिंकले आहेत. त्याच्याबरोबरच धोनीनेही ५ करंडक जिंकले आहेत.
(हेही वाचा – grok ai image generator कसे वापरावे? याची स्टेप-बाय-स्टेप माहिती पाहा!)
मुंबईच्या ताफ्यात दाखल झालेल्या नवीन खेळाडूंबद्दल रोहितने आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘ट्रेंट बोल्ट (Trent Boult) मुंबईकडे परतला आहे. त्यामुळे या हंगामात फरक पडला आहे. त्याच्याकडे अनुभव आणि कौशल्य दोन्ही आहे. तर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरकडेही (Mitchell Santner) भारतीय खेळपट्ट्यांवर खेळण्याचं कौशल्य आहे. विल जॅक्स, रीस टोपली आणि रायन रिकलटन यांच्या आगमनाने संघात खूप फरक पडला आहे. आणि हे सगळे प्रभावी खेळाडू आहेत. या सगळ्यांमुळे मलाही प्रेरणा मिळते. आणि माझं उद्दिष्टं आता हेच आहे की, आयपीएल चषक पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) ड्रेसिंग रुममध्ये आणावा,’ असं शेवटी रोहितने (Rohit Sharma) बोलून दाखवलं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community