रोहित शर्माने केला षटकारांचा विश्वविक्रम

नागपुरात झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने तुफानी फलंदाजी केली. रोहित शर्माने षटकार ठोकून १७६ षटकारांचा विश्वविक्रम केला आहे. या सामन्यात रोहितने अवघ्या २० चेंडूत नाबाद ४६ धावा कुटल्या. त्यात चार षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारतीय संघ हा सामना सहा गडी राखून जिंकू शकला.

मार्टिन गप्टिलला मागे टाकले 

दोन्ही बाजूने ८-८ षटकांचा सामना रंगला. त्यात ऑस्ट्रेलियाने ८ षटकांत दमदार फटकेबाजी करत ९० धावा केल्या. पण भारताने ७.२ षटकांतच हा सामना खिशात घातला. या सामन्यात रोहितच्या दमदार खेळीमुळे त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. रोहित शर्माने न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलला मागे टाकत टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाचा मान मिळवला. दुसऱ्या टी२० सामन्यापूर्वी रोहित आणि गप्टिल दोघांच्या नावावर १७२ षटकारांची नोंद होती नोंदवले गेले होते. रोहित शर्माने भारतीय डावाच्या पहिल्याच षटकात वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडच्या चेंडूवर षटकार ठोकून गप्टिलला मागे टाकले. रोहित शर्माने आत्तापर्यंत टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार शतके आणि २८ अर्धशतके झळकावली आहेत.

(हेही वाचा पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही – देवेंद्र फडणवीसांचा इशारा)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here