-
ऋजुता लुकतुके
भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियात पोहोचणार का हे अजून ठरलेलं नाही. पण, मुंबईत त्याने आपला सराव सुरू ठेवला आहे. रोहित आणि त्याची पत्नी रितिका आपल्या दुसऱ्या अपत्याची वाट पाहत आहेत. त्यासाठी त्याने सध्या सुटी घेतली आहे. आणि तो नेमका कधी ऑस्ट्रेलियाला जाणार हे अजून ठरलेलं नाही. त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. आणि रोहित ऐवजी के एल राहुल किंवा अभिमन्यू ईश्वरन यांना सलामीला संधी मिळण्याची शक्यता आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर तसंच रिलायन्स समुहाच्या नेट्समध्ये सध्या सराव करताना दिसतोय. ऑस्ट्रेलियात कधीही गेलं तरी तयारी हवी यासाठी रोहीतने सरावात खंड पडू दिलेला नाही. दुसऱ्या अपत्याच्या जन्मानंतरच तो ऑस्ट्रेलियाला जाण्याविषयी निर्णय घेईल.
(हेही वाचा – काँग्रेस आमदारांना ५० कोटी देऊन खरेदीचा भाजपचा प्रयत्न; CM Siddaramaiah यांचा आरोप)
View this post on Instagram
‘रोहित ऑस्ट्रेलियाला नेमका कधी जाणार हे अजून ठरलेलं नाही. एका वडीलाचं कर्तव्य तो निभावताना दिसत आहे, पत्नीला गरज असताना तो तिच्या आणि मुलीबरोबर कौंटुंबिक जबाबदारी पार पाडताना दिसतोय. पण, त्याचवेळी त्याने सराव सोडलेला नाही. उसळत्या चेंडूंचा सराव तो करत आहे. आणि ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी तो सज्ज आहे,’ असं रोहितच्या निकटवर्तीयाने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे.
भारताची ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका २२ नोव्हेंबरला पर्थ कसोटीने सुरू होत आहे. तर दुसरी सिडनी कसोटी ४ डिसेंबरला होणार आहे. आणि आताच्या माहितीनुसार, रोहित पहिल्या दोन कसोटींत खेळेल की नाही याविषयी अनिश्चितता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community