- ऋजुता लुकतुके
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी भारतीय टी-२० क्रिकेटला दिलेल्या भरीव योगदानासाठी दोघांचे खास आभार मानले आहेत. ‘दोघं निवृत्त होतील. पण, त्यांच्या भोवतीचं वलय कायम राहील,’ असं बीसीसीआयने ट्विट केलेल्या संदेशात म्हटलं आहे. शनिवारी टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना संपल्या संपल्या विराटने टी-२० मधून निवृत्तीची घोषणा केली. रोहितने बक्षीस समारंभात सूरात सूर मिसळला. तर दुसऱ्या दिवशी रवींद्र जाडेजा दोघांना येऊन मिळाला. (Rohit, Virat Retire)
यावर ‘टी-२० क्रिकेटमधील एक पर्व संपत आहे. रोहित शर्मा व विराट कोहली हे दोन दिग्गज खेळाडू आहेत. त्यांना धन्यवाद देऊया,’ असं ट्विट बीसीसीआयने केलं आहे. (Rohit, Virat Retire)
An Era Comes To An End in T20Is! 😢
The Aura Will Stay Forever! ☺️
2️⃣ Legends of the game 🙌
45 🤝 18
Thank you, Rohit Sharma and Virat Kohli 🫡 🫡#T20WorldCup | #TeamIndia | #SAvIND | @ImRo45 | @imVkohli pic.twitter.com/SD7wCmofZO
— BCCI (@BCCI) June 30, 2024
(हेही वाचा – Indian Team News : ‘श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाबरोबर नवीन प्रशिक्षक असेल,’ – जय शाह)
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी मागच्या दोन दशकांत भारतीय संघासाठी मोठं योगदान दिलं आहे. विराट कोहली २००७ साली दक्षिण आफ्रिके विरुद्ध आपला पहिला पहिला टी-२० सामना खेळला. तिथपासून आतापर्यंतचे सगळे टी-२० विश्वचषक भारतासाठी खेळला आहे. १४ वर्षांत १२५ सामन्यांत त्याने ४,१८८ धावा जमवल्या आहेत. यात १ शतक आणि ३८ अर्धशतकं आहेत. क्रिकेट प्रती समर्पणाची भावना आणि सातत्य यामुळे विराट हा टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या वर आहे तो रोहित शर्मा. (Rohit, Virat Retire)
रोहित १५९ टी-२० सामने खेळला आहे आणि यात त्याने ४,२३१ धावा जमवल्या आहेत. टी-२० मध्ये सर्वाधिक पाच शतकं त्याच्या नावावर आहेत. २००७ च्या टी-२० विश्वचषकात तो भारतीय संघात आला आणि तेव्हापासून तो नितांतसुंदर फटकेबाजीसाठी ओळखला जातो. यंदाही विश्वचषक स्पर्धेत त्याने ९ सामन्यांत २४८ धावा केल्या आहेत. (Rohit, Virat Retire)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community