Rohit, Virat Test Career : रोहित, विराट किती काळ खेळत राहतील, यावर हरभजनला काय वाटतं?

विराट कोहलीच्या तंदुरुस्तीकडे हरभजनने लक्ष वेधलं आहे.

86
Rohit, Virat Test Career : रोहित, विराट किती काळ खेळत राहतील, यावर हरभजनला काय वाटतं?
Rohit, Virat Test Career : रोहित, विराट किती काळ खेळत राहतील, यावर हरभजनला काय वाटतं?
  • ऋजुता लुकतुके

विराट कोहलीची तंदुरुस्ती पाहता तो आणखी पाच वर्षंही खेळू शकतो, असं मत माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) व्यक्त केलं आहे. तर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणारा रोहित शर्माही आणखी दोन वर्षँ खेळेल, असं हरभजनला वाटतं. ‘रोहित आणखी दोन वर्षं सहज खेळेल. आणि विराट तर संघातील सगळ्यात तंदुरुस्त खेळाडू आहे. ते पाहता तो अजून पाच वर्षं खेळला तरी आश्चर्य वाटायला नको,’ असं हरभजन पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला आहे. (Rohit, Virat Test Career)

हरभजनच्या नावावर ७०० हून जास्त आंतरराष्ट्रीय बळी आहेत. आणि रोहित, विराट तंदुरुस्त असतील, चांगली कामगिरी करत असतील आणि त्यांच्यामुळे संघ जिंकत असेल तर त्यांनी खेळत रहावं असंच त्याचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर कसोटी क्रिकेटसाठी ते आवश्यक आहेत असंही त्याला वाटतं. (Rohit, Virat Test Career)

(हेही वाचा – BMC : महापालिका प्रशासनाचा प्रताप; एक कोटीच्या मशीनसाठी प्रत्येक वर्षी एक ते सव्वा कोटींचा खर्च)

‘कसोटी क्रिकेटचा प्रश्न असेल तर दोघांनी आणखी काही काळ खेळण्यातच देशाचं हित आहे. अनुभव महत्त्वाचा असतो. ते फक्त संघात खेळणार नाहीएत. तर नवीन खेळाडू घडवणार आहेत. त्यामुळे तंदुरुस्त असतील तर त्यांनी खेळलं पाहिजे आणि त्यांना खेळवलं गेलं पाहिजे,’ असं हरभजनने आवर्जून सांगितलं.

पण, त्याचवेळी हरभजनने एक धोक्याची घंटाही वाजवली. ‘आपण सकारात्मक बोलतोय ते या भरवशावर की, ते चांगली कामगिरी करतायत. जर खेळाडूने समाधानकारक कामगिरी केली नाही. आणि तंदुरुस्तीही त्यांना राखता आली नाही. तर त्यांना वगळून नवीन खेळाडूंना संधी देण्याचाच मार्ग आपल्याकडे उऱतो,’ असं शेवटी हरभजन सिंग (Harbhajan Singh) म्हणाला.

रोहित आणि विराट दोघांनीही टी-२० विश्वचषकातील विजयानंतर या प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. पण, सध्या तरी चॅम्पियन्स करंडक आणि पुढील वर्षी होणारी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपर्यंत ते खेळत राहणार आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jai Shah) यांनी ही गोष्ट आधीच स्पष्ट केली आहे. (Rohit, Virat Test Career)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.