- ऋजुता लुकतुके
न्यूझीलंड विरुद्ध भारताला ०-३ असा पराभव पत्करावा लागला. घरच्या मैदानावर फिरकीला साजेशा खेळपट्टीवर झालेल्या पराभवामुळे भारतीय फलंदाजांचे फिरकीला खेळतानाचे कच्चे दुवे उघड झाल्याचं बोललं जात आहे. फिरकीला खेळण्याचं तंत्र भारतीय फलंदाज विसरत चालले आहेत का, असा प्रश्नही विचारला जात आहे. अनेकांना आठवण येतेय चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य राहणेची. २०१० च्या दशकात भारतीय संघाला परदेशात विजय मिळवून देताना आणि कसोटीतील अव्वल संघ म्हणून गदा मिळवतानाही हे दोघं संघाचा अविभाज्य भाग होते. आता भारतीय फलंदाज फिरकीवरुद्ध झगडत असताना या दोघांची आठवण चाहत्यांना येणं स्वाभाविकच आहे. शिवाय दोघंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले नाहीत. त्यामुळे आता ते संघात येऊ शकतील का, असाही प्रश्न समोर आहे. (Rooting For Pujara & Rahane ?)
(हेही वाचा – IPL Retentions 2024 : कोलकाता संघाने खेळाडूंसाठी ५७ कोटी रुपये मोजल्यानंतरही त्यांच्याकडे ६९ कोटी रुपयेच कसे उरले?)
पण, सुनील गावस्कर यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय संघाची फलंदाजी शैलीच आता बदलली आहे आणि अशावेळी या दोघांचा विचार होणं शक्य नाही. ‘तीन किंवा चार चेंडूंवर धावा नाही निघाल्या तरी फलंदाजाला अलीकडे वाटतं पुढील चेंडूवर चौकार किंवा षटकार वसूल झाला पाहिजे. ही मानसिकताच आता बदलली पाहिजे. संघाच्या एकूण आक्रमक रणनीतीमुळे रहाणे किंवा पुजारासारख्या खेळाडूंना आता संघात जागा उरलेली नाही,’ असं सुनील गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्स वाहिनीशी बोलताना सांगितलं. (Rooting For Pujara & Rahane ?)
(हेही वाचा – Pandharpur Vitthal Temple : वारकऱ्यांसाठी खुशखबर! कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरीत २४ तास विठ्ठल दर्शन )
पुढे जाऊन गावस्कर यांनी लाल चेंडू आणि पांढऱ्या चेंडूतील बदलही सांगितला. कसोटीसाठी लाल आणि एकदिवसीय क्रिकेटसाठी पांढरा चेंडू वापरला जातो. ‘पांढरा चेंडू जास्त स्विंग होत नाही. तितकासा वळतही नाही. पण, लाल चेंडूला स्विंग असतो आणि फिरकीही मिळते. त्यामुळे या चेंडूवर खेळताना थोडा धीर अंगात असायला हवा. प्रत्येक चेंडू मारता येणार नाही हे समजून खेळायला हवं,’ असं गावस्कर म्हणाले. रहाणे आणि पुजाराची शैली अशी होती की, ते आधी गोलंदाजाला दमवायचे आणि मग त्यांच्यावर आक्रमण करायचे. ही शैली आता भारतीय संघ विसरलाय, असं गावस्कर यांना वाटतं. (Rooting For Pujara & Rahane ?)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community