मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने रचला नवा इतिहास; आधी ७ षटकार आता सेमीफायनलमध्ये अफलातून कामगिरी

119

महाराष्ट्र संघाचा कॅप्टन आणि चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू ऋतुराज गायकवाड सध्या जबरदस्त फॉर्ममद्ये आहे. टीम इंडियामध्ये त्याने त्याचे स्थान गमावले तरीही त्याने सातत्याने धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये शतक झळकावले होते त्यानंतर आता त्याने सेमीफायनलमध्ये सुद्धा शतकी कामगिरी केली आहे. त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. ६० पेक्षा जास्त सरासरी धावा करणारा तो क्रिकेट विश्वातील एकमेव फलंदाज आहे.

( हेही वाचा : कोकण टूर सर्किटमधून डिसेंबरमध्ये चार मोफत सहली; येथे करा नोंदणी )

सेमीफायनलमध्ये शतक

महाराष्ट्राचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडने आसामविरुद्ध ८८ चेंडून शतक झळकावले आहे. ऋतुराज गायकवाडने या मॅचमध्ये १६८ धावांची जबरदस्त इनिंग खेळला. यावेळी त्याने ६ षटकार आणि १८ चौकार लगावले.

ऋतुराज गायकवाडचा विक्रम

विजय हजारे ट्रॉफीच्या अनेक सामन्यांमध्ये ऋतुराज गायकवाडने विक्रम केले आहेत. यात एका द्विशतकाचा सुद्धा समावेश आहे. ऋतुराज गायकवाडने उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात नाबाद २२० धावा केल्या आहेत. त्याने या सामन्यात अनेक विक्रम केले आहे. यामध्ये शिवा सिंहच्या एका ओव्हरमध्ये त्याने ७ सिक्स मारले होते. उत्तर प्रदेशविरुद्ध त्याने एका षटकात तब्बल सात षटकार मारले. अशी कामगिरी करणारा ऋतुराज हा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. ऋतुराज गायकवाडचा सध्या चांगला फॉर्म आहे. यापूर्वी युवराज सिंगने एका षटकात सहा षटकार मारले होते आता ऋतुराजने या विश्वक्रमाशी बरोबरी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.