ऋजुता लुकतुके
गुवाहाटी इथं झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५ गडी राखून विजय मिळवला. ग्लेन मॅक्सवेलचं ५२ चेंडूत केलेलं शतक ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad Century) शतकावर भारी ठरलं. पण, ऋतुराजसाठीही हा दिवस अविस्मरणीय होता. कारण, त्याचं हे पहिलंच आंतरराष्ट्रीय शतक होतं. शिवाय भारतीयाने टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेलं हे पहिलंच शतक होतं.
गायकवाडने यशस्वी जयसवाल आणि सुर्यकुमार यादव हे संघातील घणाघाती फलंदाज लवकर बाद झाल्यानंतरही फलंदाजीची सूत्र आपल्या हातात घेत ५७ चेंडूंत १२३ धावा फटकावल्या. त्याच्या जोरावरच भारतीय संघ २२३ धावांची मजल मारु शकला. तिलक वर्मासोबत त्याने १४१ धावांची भागिदारी रचली. बीसीसीआयने ऋतुराजच्या या खेळीची क्षणचित्रं काढून ती ट्विट केली आहेत.
ICYMI – A Ruturaj Gaikwad special to Relish, Rewatch and Relive.
Sit back and enjoy his sensational HUNDRED 👇👇https://t.co/DTG7Oi6q44#INDvAUS @IDFCFIRSTBank @Ruutu1331
— BCCI (@BCCI) November 28, 2023
ऋतुराजच्या (Ruturaj Gaikwad Century) खेळाचं वैशिष्ट्य हे की, भारतीय संघाने १५० धावांचा टप्पा १७व्या षटकांत गाठला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे भारताला दोनशेच्या आत रोखण्याची संधी होती. पण, शेवटच्या तीन षटकांत ऋतुराजने चौकार आणि षटकारांची आतषबाजी करून भारताला दोनशेचा टप्पा आरामात गाठून दिला. दुर्दैवाने त्याची ही खेळी अल्पजीवी ठरली. आणि ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने ५४ धावांत धुवाधार शतक ठोकून संघाला विजय मिळवून दिला.
ICYMI – A @Ruutu1331 batting masterclass on display here in Guwahati.
Watch his three sixes off Aaron Hardie here 👇👇#INDvAUS @IDFCFIRSTBank pic.twitter.com/BXnQlOAMB0
— BCCI (@BCCI) November 28, 2023
ऋतुराज रोहीत, विराट यांच्या क्लबचा सदस्य
या शतकासह टी-२० प्रकारात शतक ठोकणारा ऋतुराज हा नववा भारतीय फलंदाज ठरला आहे. आणि या कामगिरीमुळे तो रोहीत शर्मा, विराट कोहली, के एल राहुल यांच्या पंक्तीत बसला आहे. शिवाय हे त्याचं शतक ५२ चेंडूंत केलेलं आहे. ६० पेक्षा कमी चेंडूत ही किमया करणारा रोहीत आणि विराट नंतरचा तो तिसराच भारतीय फलंदाज आहे.
तर टी-२० प्रकारातील भारताकडूनची ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. यापूर्वी शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्ध नाबाद १२६ धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-२० प्रकारात भारतीय फलंदाजाने केलेलं हे पहिलंच शतक आहे.
Join Our WhatsApp Community