मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा विश्वविक्रम! अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच फलंदाज

195

विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने विश्वविक्रम केला आहे. उत्तर प्रदेशविरुद्ध त्याने एका षटकात तब्बल सात षटकार मारले. अशी कामगिरी करणारा ऋतुराज हा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. ऋतुराज गायकवाडचा सध्या चांगला फॉर्म आहे. यापूर्वी युवराज सिंगने एका षटकात सहा षटकार मारले होते आता ऋतुराजने या विश्वक्रमाशी बरोबरी केली आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ बस थांब्यांजवळ प्रवाशांना ‘इलेक्ट्रिक बाईक’ सेवा, फक्त २० रुपयात फिरा, कुठे कराल नोंदणी?)

ऋतुराज गायकवाडचा विश्वविक्रम

ऋतुराजने १५९ चेंडूंमध्ये २२० नाबाद धावांची खेळी केली आहे. ऋतुराज गायकवाडच्या द्विशतकामुळे महाराष्ट्राने ५० षटकांत ५ गडी गमावून ३३० धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आगामी आयपीएल हंगामासाठी ऋतुराज गायकवाडला कायम ठेवले आहे आणि आता त्याची कामगिरी पाहून चेन्नईचे सर्व चाहते खूश होतील यात शंका नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.