Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडला वगळल्यामुळे चाहते नाराज, सोशल मीडियावर मोहीम

Ruturaj Gaikwad : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऋतुराज गायकवाड ऐवजी अभिमन्यू ईश्वरनचा संघात समावेश झाला आहे. 

41
Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडला वगळल्यामुळे चाहते नाराज, सोशल मीडियावर मोहीम
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्मा पहिले दोन कसोटी सामने कदाचित खेळणार नाहीए. बीसीसीआयने अधिकृतपणे याविषयी काही सांगितलं नसलं तरी तसा जोरदार चर्चा सुरू आहेत. तसं झालं तर रोहित ऐवजी पर्थ आणि ॲडलेडमध्ये कोण खेळणार हा महत्त्वाचा प्रश्न होता. त्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ निवडीवर सगळ्यांचं लक्ष होतं. आता संघ जाहीर झाला आहे. संघासमोर आघाडीच्या फळीतील पर्याय आहे तो अभिमन्यू ईश्वरनचा. सध्या सुरू असलेला रणजी हंगाम, इराणी चषक आणि दुलिप करंडकातही अभिमन्यू ईश्वरनने सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. त्यामुळे त्याची निवड ही तशी स्वाभाविक असली तरी महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) पुढे त्याची निवड होणं काहींना रुचलं नाहीए. कारण, गेल्यावर्षी आशियाई क्रीडास्पर्धेत ऋतुराजला भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. तेव्हापासून तो भारतीय संघाच्या आत बाहेर करतोय. तसंच गेली दोन वर्षं तो नियमित निवडीसाठी संघाचे दरवाजे ठोठावत आहे. त्यामुळे संघात जागा निर्माण झालेली असताना ऋतुराजचा विचारही न होणं अनेकांना रुचलं नाहीए.

सध्या ऋतुराज (Ruturaj Gaikwad) आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आहे. तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय ए संघाचाही तो कर्णधार आहे. दुलिप, इराणी तसंच रणजी स्पर्धेतही त्याची कामगिरी चांगली आहे. ऑस्ट्रेलियातील ए संघाच्या दौऱ्यानंतर त्याला मुख्य मालिकेसाठीही संघात कायम ठेवलं जाईल असाच अनेकांचा अंदाज होता. पण, महत्त्वाचं म्हणजे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दौरा अशा दोन्ही संघांसाठी त्याची निवड झालेली नाही. त्यानंतर सोशल मीडियावर एक मोहीमच सुरू झाली आहे. नेटकऱ्यांनी ऋतुराजची अनुपस्थिती हे क्रिकेटमधील राजकारण आणि सापत्न वागणूक असल्याचं म्हटलं आहे.

(हेही वाचा – Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित ठाकरेंना समर्थन देण्यासाठी महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.