- ऋजुता लुकतुके
दक्षिण आफ्रिकेतील उर्वरित दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने (BCCI) काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. (Ind vs SA)
रविवारपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची एकदिवसीय मालिका सुरू होत आहे आणि त्यापूर्वी बीसीसीआयने (BCCI) काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. तेज गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) आणि मोहम्मद शामी (Mohammed Shami) हे दौऱ्यातून आऊट झाले आहेत. आता ते आफ्रिकेला जाणार नाहीत. शिवाय कसोटी मालिकेच्या दृष्टीनेही काही बदल करण्यात आले आहेत. (Ind vs SA)
मोहम्मद शामीच्या (Mohammed Shami) पायाचा घोटा दुखावला होता. तर दीपक चहर (Deepak Chahar) कौटुंबिक समस्येमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नव्हता. दोघांची निवड करताना बीसीसीआयने (BCCI) ते उपलब्ध असतील तर या तत्त्वावर केली होती. पण, आता ते आफ्रिकेला जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. (Ind vs SA)
(हेही वाचा – Jaguar F-Type R-Dynamic Black : जॅग्वारची ही डायनॅमिक स्पोर्ट्स कार आता भारतात, किंमत ठाऊक आहे का?)
विश्वचषकादरम्यान भारताचा सगळ्यात यशस्वी गोलंदाज ठरलेला मोहम्मद शामी (Mohammed Shami) पायाच्या घोट्याच्या दुखापतीमुळे बेजार आहे. तो उपचार घेत असला तरी चालताना आणि धावताना त्याला अजून त्रास होत आहे. त्यामुळे त्याने कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. तर दीपक चहर (Deepak Chahar) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यानच कौटुंबिक काही अडचणींमुळे दक्षिण आफ्रिकेला गेला नव्हता. आता त्यानेही बीसीसीआयला (BCCI) आपली अनुपलब्धता कळवली आहे. दीपक चहरच्या (Deepak Chahar) जागी आता आकाश दीप दक्षिण आफ्रिकेला जाईल. (Ind vs SA)
🚨 NEWS 🚨
Deepak Chahar withdrawn from the ODI series; Mohd. Shami ruled out of the Test series.
Details 🔽 #TeamIndia | #SAvIND https://t.co/WV86L6Cnmt pic.twitter.com/oGdSJk9KLK
— BCCI (@BCCI) December 16, 2023
(हेही वाचा – Parliament Security Breach: संसद घुसखोरीतील ६वा आरोपी पकडला)
आणखीही काही बदल बीसीसीआयने (BCCI) मीडियाला कळवले आहेत. यात १७ तारखेच्या एकदिवसीय सामन्यानंतर श्रेयस अय्यर कसोटी संघाला जाऊन मिळणार आहे. त्यामुळे पुढील दोन एकदिवसीय सामन्यांसाठी तो उपलब्ध नसेल. (Ind vs SA)
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजीचे प्रशिक्षक पारस म्हांब्रे आणि क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक टी दिलिप हे ही कसोटी संघाबरोबर सेंच्युरिअनला जातील. त्यामुळे एकदिवसीय संघाबरोबर भारतीय ए संघाचा प्रशिक्षक वर्ग असेल. यात अजय रात्रा, सीतांषू कोटक आणि राजीब दत्ता यांचा समावेश असेल. (Ind vs SA)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community